Mhada house  Saam tv
मुंबई/पुणे

Konkan Mhada House : म्हाडाच्या घरांसाठी अर्जांचा पाऊस; सानपाड्यातील २ घरांसाठी तब्बल ६१५६ अर्ज, प्राइम लोकेशन आहे तरी कुठं?

Konkan Mhada House update : म्हाडाच्या घरांसाठी अर्जांचा पाऊस पडला आहे. नवी मुंबईच्या सानपाड्यातील २ घरांसाठी तब्बल ६१५६ अर्ज आले आहेत.

Vishal Gangurde

सानपाड्यातील २ घरांसाठी तब्बल ६,१५६ अर्ज

अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटातील घरांसाठी अर्ज

कोकण मंडळाच्या ५,३५४ घरांसाठी १.८४ लाख अर्ज

म्हाडा लॉटरी म्हणजे आता नशिबाची परीक्षाच असल्याचा अर्जदारांचा सूर.

संजय गडदे, साम टीव्ही

म्हाडा लॉटरीतील स्वस्तातील घराचे स्वप्न म्हटले की अर्जदारांची झुंबड उडते हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. म्हाडा कोकण मंडळाच्या २० टक्के योजनेत नवी मुंबईतील सानपाडा येथील दोन अत्यल्प उत्पन्न गटाच्या घरांसाठी तब्बल ६१५६ अर्ज आलेत. इतकेच नव्हे तर अल्प उत्पन्न गटातील केवळ १७ घरांसाठी तब्बल १८,२२७ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात 'नशीबात असेल तरच म्हाडाचे घर मिळेल! अशी आता अर्जदारांची स्थिती झालीये.

म्हाडा कोकण मंडळाकडून 2025 या वर्षासाठी तब्बल 5354 घरे लॉटरीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या घरांसाठी अर्जदारांकडून अक्षरशा झुंबड उडाली असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे घरांच्या किमतीही अत्यंत अल्प आहेत.सानपाड्यातील अत्यल्प उत्पन्न गटाचे २९ चौ.मी. क्षेत्रफळाचे घर १४.४२ लाख रुपये तर अल्प उत्पन्न गटाचे ३७ ते ४९ चौ.मी. क्षेत्रफळाचे घर १८ ते २४ लाख रुपये किमतीत उपलब्ध करून देण्यात आले आहे.

कोकण मंडळाने जाहीर केलेल्या ५३५४ घरं आणि ७७ भूखंडांसाठी एकूण १.८४ लाख अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी १.५८ लाख अर्ज अनामत रकमेसह आहेत. यामध्ये सर्वाधिक मागणी खासगी बिल्डरांकडून म्हाडाला मिळालेल्या २० टक्के योजनेतील ५६५ घरांसाठी तब्बल १.४६ लाख अर्जांची झाली आहे.

याउलट १५ टक्के योजनेला अर्जदारांनी पाठ फिरवली आहे. आता ३ हजारांहून अधिक घरांसाठी फक्त ४,९८५ अर्ज आले आहेत. विखुरलेल्या इतर १६७७ घरांसाठी ५,०४६ अर्ज आणि ५० टक्के योजनेतील ४१ घरांसाठी १,३३८ अर्ज प्राप्त झाले आहेत.

अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटातील घरांसाठी अर्जदारांची झुंबड पाहता ‘म्हाडा लॉटरी’ ही आता नशिबाची खरी परीक्षा ठरत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. सानपाड्यातील दोन घरांसाठी आलेल्या 6156 अर्जदारांमधून कोणाचे भाग्य उजाळेल हे सोडतीच्या दिवशीच समजणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Cricket News : माजी क्रिकेटपटू शोएब मलिकचा तिसरा घटस्फोट होणार? व्हायरल व्हिडिओमुळे चर्चांना उधाण

‘नायक नहीं खलनायक है तू'; काँग्रेसचे नेते संजू बाबावर लय संतापले, काय आहे कारण?

Ganesh Naik Vs Eknath Shinde: ठाण्यात शिंदेसेना विरुद्ध भाजप, नाईक विरुद्ध शिंदे वाद लायकीवर?

Balasaheb Thackeray Death Controversy: बाळासाहेबांचा मृतदेह दोन दिवस का ठेवला? रामदास कदमांच्या विधानामुळे राजकीय खळबळ

Laxman Hake: मराठा नेते मनोज जरांगेंच्या मागण्यांवर लक्ष्मण हाके काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT