Kokan MHADA Home Lottey Update News Saam tv
मुंबई/पुणे

MHADA Lottery : खुशखबर! म्हाडाच्या ५००० घरांची लॉटरी लवकरच, तारीख आली समोर; कुठे किती घरं असणार?

Kokan MHADA Lottery Update News : म्हाडा कोकण मंडळाकडून ठाणे, कल्याण, डोंबिवली, पनवेल आणि वसई-विरार परिसरातील सुमारे ५ हजार घरांसाठी लॉटरी लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. इच्छुक नागरिकांसाठी ही मोठी संधी ठरणार आहे.

Alisha Khedekar

  • म्हाडा कोकण मंडळाकडून सुमारे ५ हजार घरांची लॉटरी लवकरच जाहीर होणार

  • ठाणे, कल्याण, डोंबिवली, पनवेल आणि वसई-विरार परिसरातील घरांचा समावेश

  • ऑगस्ट अखेर किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता

स्वतःच घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असत, अडथळा येतो तो खर्चाचा. परंतु आता टेन्शनच नाही कारण, घर घेणाऱ्या लाखो नागरिकांसाठी म्हाडा लवकरच लॉटरी जाहीर करणार आहे. म्हाडाच्या कोकण मंडळामार्फत ठाणे, कल्याण, डोंबिवली, पनवेल आणि वसई-विरार परिसरातील सुमारे पाच हजार घरांची लॉटरी लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. या लॉटरीची जाहिरात ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

या घरांपैकी मोठ्या प्रमाणातील घरे खासगी विकसकांकडून २० टक्के म्हाडाला मिळाली आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात घर मिळवण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. यापूर्वी म्हाडाच्या मुंबई मंडळाने २,६४० घरांसाठी लॉटरी काढली होती. या लॉटरीसाठी तब्बल ७५ हजार अर्ज आले होते. मात्र, घरांच्या किमतीमुळे सर्वसामान्य नागरिकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता अनेक नागरिकांचे लक्ष कोकण मंडळाच्या आगामी लॉटरीकडे लागले आहे.

सध्या म्हाडाकडे स्वतः बांधलेल्या घरांचा साठा मर्यादित असला तरी खासगी विकसकांकडून मिळालेली जवळपास एक हजार घरे उपलब्ध आहेत. याशिवाय ठाणे, कल्याण, डोंबिवली, पनवेल आणि वसई-विरार परिसरातून आणखी सुमारे चार हजार घरे उपलब्ध करून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.

विशेष म्हणजे, मुंबई आणि उपनगरांमधील वाढत्या घरांच्या किमतीमुळे मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्य कुटुंबांसाठी म्हाडाची लॉटरी हा घर मिळवण्याचा महत्त्वाचा पर्याय ठरतो. त्यामुळे या लॉटरीची अधिकृत घोषणा कधी होते आणि घरांच्या किमती काय असतील, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कुरकुरीत दोडक्याची भजी कशी बनवायची?

Jayanti 2 Marathi Movie: संत्याच्या आयुष्यात नवं वादळ! 'जयंती २'मध्ये उलगडणार सामाजिक परिवर्तनाची कहाणी

Rat Lifespan : तुम्हाला माहितीये का उंदीर किती वर्षे जगतो?

Maharashtra News Live Update: जंतर मंतरवर पुन्हा आंदोलन, एनएसयूआयने 'विद्यार्थी न्याय मोर्चा' काढला

Heart attack: हार्ट अटॅक किंवा कार्डियाक अरेस्टमध्ये काय फरक असतो? सोप्या शब्दांत समजून घ्या

SCROLL FOR NEXT