Mhada Flat Price Increase in Mumbai  Saam Tv
मुंबई/पुणे

Mhada Flat Price: कॉमन मॅनचं टेन्शन वाढणार! 'म्हाडा'ने मुंबईच्या घरांच्या किंमतीत केली अवाढव्य वाढ

Mhada Flat Price Increase in Mumbai : म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून ऑगस्ट 2024 मध्ये मुंबईकरांसाठी दोन हजार घरांची लॉटरी काढली जाणार आहे. या लॉटरीत गोरेगाव येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (PMY) उपलब्ध असणाऱ्या घरांच्या किमतीत तब्बल चार लाख रुपयांची वाढ केली आहे.

Saam TV News

संजय गडदे, साम टीव्ही, प्रतिनिधी

सर्वसामान्यांना स्वस्तात घरे उपलब्ध करून देणे, अशी म्हाडाची ओळख आहे. मात्र ही ओळख आता हळूहळू पुसू लागली आहे का? असा प्रश्न आता निर्माण होत आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून ऑगस्ट 2024 मध्ये मुंबईकरांसाठी दोन हजार घरांची लॉटरी काढली जाणार आहे.

या लॉटरीत गोरेगाव येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (PMY) उपलब्ध असणाऱ्या घरांच्या किमतीत तब्बल चार लाख रुपयांची वाढ केली आहे. गेल्या वर्षीच्या लॉटरी 30 लाख 44 हजारांना मिळणारे घर आता पुढील आठवड्यात निघणाऱ्या लॉटरीत या घरासाठी तब्बल 34 लाख 70 हजार रुपये मोजावे लागणार आहे.

इंटरेस्ट कॅपिटलायझेशनमुळे या किमती वाढवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. तर दुसरीकडे ताडदेव येथील क्रिसेंट टॉवरमधील एचआयजी उत्पादन गटातील घराच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आला नाही.

ताडदेव येथील घराची किंमत गेल्या वर्षीच्या लॉटरीत 7 कोटी 57 लाख इतकी होती. आता या किमतीत कोणताही बदल केला नसल्याची माहिती साम टीव्हीला सूत्रांकडून मिळाली आहे. या सोबतच जुहू येथील विक्रांत सोसायटीमधील घर देखील चार कोटी 87 लाख रुपयांना उपलब्ध होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Firing: गोळीबाराने धुळे हादरले; राजकमल टॉकीज परिसरात पोलिसांची नाकाबंदी

Bank Strike Postponed: दिलासादायक बातमी! ३ दिवसांचा देशव्यापी बँक संप पुढे ढकलला; IBA आणि बँक संघटनेच्या बैठकीत काय घडलं?

Chanakya Niti : खूप मोठं व्हायचंय? चाणक्यांची ही खास नीती लक्षात ठेवा, सर्व इच्छा होतील पूर्ण

Monday Horoscope : नशिबाची साथ मिळेल! 5 राशींच्या व्यक्तींची होणार चांदी, वाचा सोमवारचे राशीभविष्य

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

SCROLL FOR NEXT