म्हाडाच्या परीक्षा पुढे ढकलल्या; जितेंद्र आव्हाडांची माहिती Saam Tv
मुंबई/पुणे

म्हाडाच्या परीक्षा पुढे ढकलल्या; जितेंद्र आव्हाडांची माहिती

विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी जानेवारीपर्यंत वाट पहावी लागणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - म्हाडाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. म्हाडाच्या व इतर परीक्षा काही अपरिहार्य आणि तांत्रिक अडचणींमुळे पुढे ढकलण्यात आल्या असून या परीक्षा आता जानेवारीमध्ये होणार आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी जानेवारीपर्यंत वाट पहावी लागणार आहे. परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांची जी गैरसोय होणार आहे, त्याबद्दल मी क्षमा मागतो. म्हाडाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी. विद्यार्थ्याने परीक्षा सेंटरवर जाऊ नये, असे जितेंद्र आव्हाड यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे.

म्हाडाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याबाबद ट्विट करत जितेंद्र आव्हाड म्हणले की, या परीक्षा संदर्भात काही जणांनी दलालांना पैसे दिले होते असे माझ्या कानावर आले आहे. तुम्ही ज्या कोणत्या व्यक्तीला पैसे दिले असतील तर ते हक्काने परत घ्या. म्हाडाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनो तुमचा अधिकार, बुद्धीचा सन्मान करत पैशाने तो मारला जाईल असे मी कधीच होऊ देणार नाही.

माझ्याकडे आलेल्या तक्रारीमध्ये काही लोकांनी आपली जमीन विकली तर काही लोकांनी आपल्या घरातले दागिने विकले आहेत. कोणी कर्ज काढले आहेत. त्यामुळे माझी या दलालांना नम्र विनंती आहे की हे पैसे ज्यांच्याकडून घेतले आहे त्यांना परत करा. कारण तुम्ही त्यांचे काम करू शकणार नाही आणि मी ते होऊ देणार नाही असे देखील जितेंद्र आव्हाड म्हणले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

फ्रिज भरताना 'या' चुका करताय? जाणून घ्या कोणती वस्तू कुठे ठेवल्यास अन्न राहील फ्रेश

Pune : पुण्यात इंजिनियरिंग शिक्षण घेणाऱ्या २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?

Maharashtra News Live Update : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, ११ आरोपीना आज कोर्टात हजर करण्यात आले

EPFO Update: ३० कोटी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, EPFO मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Kurti Designs For Women: महिलांसाठी कुर्तीच्या लेटेस्ट 7 डिझाइन्स, डेलीवेअर आणि ऑफिससाठी ठरतील बेस्ट

SCROLL FOR NEXT