Manasvi Choudhary
महिलांच्या ड्रेसिंग स्टाईलमध्ये कुर्ती स्टाईलला विशेष महत्व आहे. घर, ऑफिस किंवा कॉलेजला जाणाऱ्या तरूणी महिलांसाठी कुर्ती बेस्ट ऑप्शन आहे.
तुम्हालाही डेलीवेअर किंवा ऑफिस लूकसाठी नवीन कुर्ती घ्यायचे असेल तर सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेल्या कुर्तीच्या ७ लेटेस्ट डिझाइन्स पाहा.
ऑफिस वेअरसाठी स्ट्रेट कट कुर्ती हा पॅटर्न बेस्ट आहे. ही कुर्ती दिसायला फॉर्मल, प्रोफेशनल आणि अतिशय वाटते.
फुलांच्या डिझाईन्स असणाऱ्या फ्लोरल प्रिंट कुर्तीज कायम ट्रेडिंगमध्ये असतात. डेलीवेअरसाठी या कुर्ती बेस्ट आहेत.
जॉर्जेट किंवा कॉटनमधील प्रिटेंड कुर्ती तुम्ही ऑफिससाठी किंवा डेलीवेअरसाठी निवडू शकता.
आजकाल तरुणींमध्ये शॉर्ट कुर्तीची खूप क्रेझ आहे. जिन्स, प्लाझो किंवा पॅन्टवर शॉर्ट कुर्ती सुंदर लूक दिसतो.
फॉर्मल लूकसाठी शर्ट स्टाईल कॉलर डिझाईनची कुर्ती बेस्ट आहे. यात पुढच्या बाजूला बटन्स आणि कॉलर असते, ज्यामुळे अतिशय प्रोफेशनल लूक दिसतो.Embroidered Yoke Kurti
कार्यक्रमासाठी तुम्ही खास एम्ब्रॉयडरी वर्क केलेली कुर्ती डिझाईन निवडू शकता.