Mumbai Mhada Saam tv
मुंबई/पुणे

Free Homes Mumbai: सर्वसामान्य मुंबईकरांचं स्वप्न पूर्ण होणार; ८,००० कुटुंबांना विनामूल्य मिळणार ५०० चौरस फुटांची घरे

Mumbai Mhada news : कमाठीपुऱ्यातील ८,००० कुटुंबांना विनामूल्य घरे मिळणार आहेत. म्हाडाच्या उपाध्यक्षांनी याबाबत महत्वाची माहिती दिली.

Vishal Gangurde

म्हाडाने कामाठीपुरा पुनर्विकास प्रकल्पांतर्गत ८,००० कुटुंबांना ५०० चौरस फुटांची घरे विनामूल्य देण्याची घोषणा

या प्रकल्पामुळे जुनी आणि मोडकळीस आलेली वसाहत नव्या स्वरूपात पुनर्जिवित होणार

जपानच्या अर्बन रिनेसान्स एजन्सीने म्हाडासोबत शहरी पुनर्विकासात सहकार्याचे दिलं आश्वासन

बीडीडी चाळ आणि मोतीलाल नगर प्रकल्पांसह महाराष्ट्रात परवडणाऱ्या गृहनिर्माण क्षेत्रात नवे पर्व सुरू होणार

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबई : जपानच्या अर्बन रिनेसान्स एजन्सी (UR) च्या ग्लोबल अफेअर्स विभागाच्या प्रतिनिधी मंडळाने आज म्हाडाच्या वांद्रे (पूर्व) येथील मुख्यालयास भेट देऊन महाराष्ट्रातील गृहनिर्माण, पुनर्विकास आणि क्लस्टर विकास प्रकल्पांचा आढावा घेतला. या भेटीमुळे भारत आणि जपानदरम्यान परवडणाऱ्या गृहनिर्माण व शहरी पुनर्विकास क्षेत्रात नव्या सहकार्याच्या दालनांना प्रारंभ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.कमाठीपुरात ८,००० कुटुंबांना ५०० चौरस फुटांची घरे विनामूल्य दिली जाणार असल्याची माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिले.

या शिष्टमंडळाचे नेतृत्व UR चे संचालक ओकामुरा टोमोहीतो यांनी केले, तर म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल (भा.प्र.से.) यांनी त्यांचे स्वागत केले. भेटीदरम्यान दोन्ही देशांतील गृहनिर्माण आणि पुनर्विकास क्षेत्रातील तांत्रिक अनुभवांची देवाणघेवाण, गुंतवणुकीची संधी आणि शाश्वत शहरी विकासाच्या मॉडेल्सवर चर्चा झाली.

जयस्वाल यांनी म्हाडाच्या विविध प्रकल्पांची माहिती देताना सांगितले की, बी.डी.डी. चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत १६,००० कुटुंबांना मोफत दोन बेडरूमची घरे दिली जातील. तसेच गोरेगाव येथील मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्प देशातील सर्वात मोठ्या पुनर्विकास योजनांपैकी एक ठरणार असून सुमारे १,६०० चौरस फुटांच्या आधुनिक घरांची निर्मिती होणार आहे.

त्यांनी पुढे सांगितले की, कामाठीपुरा क्लस्टर पुनर्विकास प्रकल्प हे म्हाडाचे महत्त्वाकांक्षी स्वप्न असून, या प्रकल्पामुळे जुनी आणि मोडकळीस आलेली वसाहत नव्या स्वरूपात पुनर्जिवित होईल. येथे सुमारे ८,००० कुटुंबांना ५०० चौरस फुटांची घरे विनामूल्य दिली जाणार आहेत, तसेच परिसराचा ऐतिहासिक वारसा जपण्यावरही भर दिला जाणार आहे.

ओकामुरा टोमोहीतो यांनी महाराष्ट्र शासन आणि म्हाडा यांच्या शहरी पुनर्विकासाच्या प्रयत्नांचे कौतुक करत भारताच्या स्मार्ट आणि समावेशक शहर उभारणीच्या मोहिमेत जपानकडून सहकार्याचे आश्वासन दिले. त्यांनी म्हटले की, “परवडणारे गृहनिर्माण आणि शहरी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी भारतात सहकार्याच्या प्रचंड संधी आहेत, आणि अर्बन रिनेसान्स एजन्सी या क्षेत्रात सक्रिय सहभाग घेण्यास उत्सुक आहे.”

या भेटीद्वारे म्हाडा आणि जपानच्या अर्बन रिनेसान्स एजन्सीमध्ये शाश्वत, तांत्रिकदृष्ट्या प्रगत आणि नागरिककेंद्रित शहरी विकासासाठी नव्या सहकार्याच्या शक्यता दृढ झाल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: AI द्वारे बनवला बहीण-भावाचा अश्लिल व्हिडीओ, नंतर केलं ब्लॅकमेल; तरुणाची आत्महत्या

Shocking: मी जगू शकत नाही...; बायको प्रियकरासोबत पळून गेली, वकिलाने संपवलं आयुष्य

Shreyas Iyer Health Update: श्रेयस अय्यर आयसीयूमधून बाहेर; अय्यरला नेमकी दुखापत काय झाली, कधी होईल ठणठणीत?

Nashik Crime: ठाकरे सेनेच्या सावकार नेत्याचा माज उतरवला; अपहरण प्रकरणी ठोकल्या बेड्या,नंतर काढली धिंड

Mumbai Accident : मुंबईत अपघाताचा थरार; छटपूजेहून परतणाऱ्या तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT