राज्य सरकारने नवी मुंबई मेट्रो लाइन ८ ला मंजुरी देण्यात आली आहे.
ही मेट्रो दोन विमानतळांना जोडणार आहे
या मार्गावर वाशी, सानपाडा, जुईनगर, नेरूळ, सीवूड्स, उलवे यांसारखी ११ स्थानके असणार आहेत
मेट्रो ८ मुळे मुंबई ते नवी मुंबई विमानतळ प्रवास जलद होणार
नवी मुंबई : राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानळ हे नवी मुंबई विमानतळाशी जोडण्यासाठी सिटी अँड इंडस्ट्रीयल डेव्हलेपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेड (CIDCO) च्या मदतीने मेट्रो ८ बांधण्याचा निर्णय घेतला आहे. ही लाईन पहिल्यांदा नवी मुंबईच्या विविध भागांना जोडणार आहे. त्यामुळे शहरांतर्गत मेट्रोने सहज प्रवास करता येईल. या मेट्रो लाइनमध्ये ११ स्टेशन असणार आहेत.
राज्य सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर मेट्रो लाइन ८ चा सविस्तर अहवाल तयार करण्यात आला आहे. या अहवालामध्ये या मेट्रोचा मार्ग आणि स्थानकांची माहिती देण्यात आली आहे. मानखुर्दहून वाशी खाडी पूल ओलांडल्यानंतर ही मेट्रो सायन-पनवेल महामार्गाशी जोडली जाईल. तसेच हा मार्ग नेरूळ, सीवूड्स,उलवे यांसारख्या भागातून देखील जाणार आहे. त्यानंतर ही मेट्रो नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचेल. मेट्रो ८ आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या ३३७ किमी मेट्रो नेटवर्कमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे.
मेट्रो ८ मार्गाचा हा प्रकल्प सिडको आणि एमएमआरडीए यांनी संयुक्तपणे बांधण्याची योजना आखली आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणीची जबाबदारी सिडकोकडे सोपवण्यात आली आहे. तसेच हा प्रकल्प खासगी भागीदारी मॉडेल अंतर्गत राबवला जाईल. एकीकडे नवी मुंबई विमानतळ २५ डिसेंबर रोजी सुरु होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे मेट्रो ८ या मार्गामुळे शहरातील वाहतुकीचे व्यवस्थापन करण्यात मोलाची भूमिका निभावेल. यामुळे मुंबईहून नवी मुंबई विमानतळावर लवकर पोहोचता येईल.
या मार्गावर कोणते स्टेशन असणार?
वाशी, सानपाडा, जुईनगर, नेरुळ सेक्टर-१, सीवूड्स, बेलापूर, सागर विहार, तारघर/मोहा, NMIA पश्चिम, NMIA टर्मिनल 2
मानखुर्दहून नवी मुंबईत शिरल्यानंतर मेट्रो सायन-पनवेल मार्गावरून वाशी, सानपाडा आणि जुईनगरमधून जाईल. त्यानंतर नेरुळच्या एलपी जंक्शनहून आतल्या रस्त्यावर जाईल. तर डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाजवळ एक मोठं स्टेशन असेल. पुढे नेरुळ-सीवूड्सवरून उलवे या मार्गावर जाईल. ही मेट्रो ८ वंडर्स पार्क स्टेशन, अपोलो हॉस्पिटल, NMMC हेडक्वॉर्टर ला जाईल. त्यानंतर सागर विहार, तारघर/मोहा स्टेशन हून उलवे नोडला जाईल. दोन्ही विमानतळांना जोडण्यास मेट्रो ८ चा मोलाचा वाटा ठरेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.