Baba Adhav Death : सर्वसामान्यांचा आवाज हरपला; ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचं निधन

Baba Adhav Passes Away : ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचं निधन झालंय. त्यांनी वयाच्या ९६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
Baba Adhav Passes Away
Baba Adhav Passes Away Saam tv
Published On
Summary

ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचं निधन

पूना रुग्णालयात आढाव यांनी 96 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

आढाव यांच्या निधनाची वार्ता अभिजीत वैद्य यांनी दिली

ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचं आज सोमवारी निधन झालं आहे. पुण्यातील पूना रुग्णालयात आढाव यांनी वयाच्या ९६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आढाव यांच्या निधनाने सर्वसामान्यांचा आवाज हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निधनाची वार्ता अभिजीत वैद्य यांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून बाबा आढाव यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांना उपचारासाठी पुण्यातील पूना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, आज रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली.

Baba Adhav Passes Away
पुण्यात अपघाताचा थरार; नवले पुलाजवळ दिवसभरात दुसरा भीषण अपघात

डॉ. बाबासाहेब पांडुरंग आढाव हे राज्यातील सामाजिक आणि श्रमिकांच्या चळवळीचे आधारस्तंभ मानले जायचे. ते सत्यशोधक विचारांचे निष्ठावान अनुयायी आणि कष्टकऱ्यांचे नेते होते. त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य असंघटित आणि वंचित कष्टकरी, विशेषतः हमाल, रिक्षाचालक आणि बांधकाम मजुरांच्या सन्मानासाठी समर्पित केलं. आढाव यांनी जातीय भेदभावाविरुद्ध 'एक गाव एक पाणवठा' या चळवळीचंही नेतृत्व केलं. त्यांनी समाजात समता प्रस्थापित करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला.

Baba Adhav Passes Away
पुण्यातील राजकारण फिरणार; भाजपविरोधात लवकरच 'लेटर बॉम्ब', पत्रात नेमकं कुणाचं नाव?

दोन दिवसांपूर्वी खासदार शरद पवार हे डॉ. बाबा आढाव यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात पोहोचले होते. त्यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूर केली होती. बाबा आढावांच्या प्रकृतीत लवकरच सुधारणा व्हावी आणि त्यांना उत्तम आरोग्य लाभावं, अशी सदिच्छा देखील पवारांनी व्यक्त केली होती.

आढाव यांच्या निधनानंतर सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून श्रद्धांजली वाहिली. 'बाबा, माझ्यासह अनेकांसाठी प्रेरणास्रोत होते. शिव-फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचा, सत्यशोधकी विचारांचा मार्ग त्यांनी अधिक प्रशस्त केला. या विचारांची शिदोरी बाबांनी आमच्या ओंजळीत भरभरुन टाकली. ते अखेरच्या क्षणापर्यंत अगदी आजारपणातही जनतेच्या हितासाठी विशेषतः हमाल, रिक्षाचालक, कामगार, कष्टकरी आणि वंचित समूहाच्या उत्थानासाठी कार्यरत होते. असे त्या म्हणाल्या.

Baba Adhav Passes Away
मुंढवा जमीन प्रकरणात मोठी कारवाई; मुख्य आरोपींमधील आणखी एकाला अटक

'बाबा आढाव हे सर्वांसाठी मोठा आधार होते. त्यांच्या जाण्यामुळे सामाजिक चळवळींच्या अवकाशात मोठी पोकळी निर्माण झालीये. देश एका वैचारिक, सत्वशील, व्रतस्थ आणि अखंड सेवाव्रती नेतृत्वाला मुकला आहे, अशा शब्दात त्यांनी बाबा आढाव यांना श्रद्धांजली वाहिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com