हिवाळी अधिवेशनात म्याव-म्याव...! नितेश राणेंनी मांजराचा आवाज काढत आदित्य ठाकरेंना डिवचले (पहा व्हिडिओ) Saam Tv
मुंबई/पुणे

हिवाळी अधिवेशनात म्याव-म्याव...! नितेश राणेंनी मांजराचा आवाज काढत आदित्य ठाकरेंना डिवचले (पहा व्हिडिओ)

आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधक विधान भवनाच्या (Vidhan Bhavan) पायऱ्यांवर बसून सरकार विरोधात घोषणाबाजी (Sloganeering) करत होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: राज्यात हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशीच विरोधकांनी पायऱ्यांवर बसून सरकार विरोधात निदर्शनं केली होती. तर आज अधिवेशनाच्या (Winter Session) दुसऱ्या दिवशीही विरोधक विधान भवनाच्या (Vidhan Bhavan) पायऱ्यांवर बसून सरकार विरोधात घोषणाबाजी (Sloganeering) करत होते, यावेळी आमदार नितेश राणेही (Nitesh Rane) पायऱ्यांवर बसून घोषणाबाजी करत होते. इतक्यात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे विधान भवनात दाखल होण्यासाठी पायऱ्यांवरुन जात असताना नितेश राणेंनी चक्क 'म्याव-म्याव' असा मांजराचा आवाज (Cat Voice) काढत त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. पण, शांत स्वभावाचे ओळखले जाणारे आदित्य ठाकरे नितेश राणेंच्या 'म्याव-म्याव'कडे दुर्लक्ष करत तिथून निघून गेले. (Meow-meow in the winter session ...! Nitesh Rane hits Aditya Thackeray with a cat's voice - watch video)

हे देखील पहा -

ठाकरे कुटुंब विरुद्ध राणे कुटुंब यांच वैर अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे. नारायण राणे असो, त्यांचे पुत्र निलेश राणे आणि नितेश राणे असो हे ठाकरे कुटुंबावर अनेकदा वैयक्तिक पातळीवर टीका करत असतात. याअगोदर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीदेखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानशीलात लगावण्याची भाषा केली होती, त्याबद्द्ल त्यांना माफीही मागावी लागली होती. मात्र तरीही शिवसेना, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना डिवचण्याचे प्रयत्न हे राणेंकडून थांबत नाही. आता हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा दोघे आमने-सामने आले आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon : अतिवृष्टीचा केळी उत्पादक शेतकऱ्यांना फटका; गिरणा नदीच्या पुरात हजारो झाडे जमीनदोस्त, शेतकरी संकटात

Maharashtra Live News Update: एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा आझाद मैदानाऐवजी नेस्कोमध्ये होणार

Thane To Buldhana Travel: ठाण्यावरुन बुलढाण्याला प्रवास कसा करायचा? रेल्वे, खाजगी बस आणि टॅक्सी जाणून घ्या सर्व मार्ग

Symptoms of Heart Attack: महिनाभर आधीच दिसतात हार्ट अटॅक लक्षणं, या ५ संकेताकडे दुर्लक्ष करू नका

Pandharpur : सोलापूरमध्ये पावसाचा जोर, पंढरपुरातील चंद्रभागा नदीने इशारा पातळी गाठली |VIDEO

SCROLL FOR NEXT