Mumbai Local Train Mega Block Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Local Train : मुंबईकरांचा पुन्हा होणार खोळंबा, रविवारी रेल्वेच्या या मार्गावर ब्लॉक; अनेक लोकल रद्द

Satish Daud

मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी उद्या म्हणजेच रविवारी (ता. २९) रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत काही ट्रेन उशिराने धावणार असून काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे विभागाने केले आहे.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वेकडून नॉन-इंटरलॉकिंगची कामे करण्यासाठी अंधेरी – गोरेगावदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर शनिवारी रात्रकालीन १० तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत सर्व लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. दुसरीकडे मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर रविवारी सकाळी ११.०५ पासून ते दुपारी ०३.५५ पर्यंत ब्लॉक असेल.

त्यामुळे धीम्या मार्गावरील लोकल सेवा जलद मार्गावर वळवण्यात येईल. या लोकल शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील. ब्लॉक कालावधीत विद्याविहार, कांजूरमार्ग, नाहूर या स्थानकांदरम्यान कोणतीही लोकल धावणार नाही. त्याचबरोबर हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशीदरम्यान अप आणि डाऊ मार्गावर रविवारी सकाळी ११.१० पासून ते दुपारी ०४.१० पर्यंत ब्लॉक असेल.

ब्लॉक कालावधीत सीएसएमटी – वाशी / बेलापूर / पनवेल अप आणि डाऊन मार्गावर धावणाऱ्या सर्व लोकलसेवा बंद ठेवण्यात येईल. ब्लॉक कालावधीत प्रवाशांच्या सेवेसाठी सीएसएमटी ते कुर्ला आणि कुर्ला ते पनवेल / वाशीदरम्यान विशेष लोकल सेवा चालवण्यात येतील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत ठाणे – वाशी / नेरूळ स्थानकांवरून प्रवास करण्याची मुभा असेल.

दुसरीकडे अंधेरी ते गोरेगाव या अप आणि डाऊन हार्बर मार्गावर शनिवारी रात्री १२.३० ते रविवारी सकाळी १०.३० वाजेपर्यंत तब्बल १० तासांचा ब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉक कालावधीत अंधेरी – गोरेगावदरम्यान हार्बर मार्गावरील लोकल सेवा उपलब्ध नाही. गेल्या रविवारी देखील या मार्गावर ब्लॉक घेण्यात आला होता. तेव्हा प्रवाशांचे अतोनात हाल झाले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: खडसेंची आणि माझी नार्कोटेस करा - महाजन

Viral Video News: 'पैलवान आला' गाण्यावर सयाजी शिंदेचा भन्नाट डान्स; जोश पाहून नेटकरी हैराण; पाहा VIDEO

Sanjay Raut: 'बोगस, बकवास सिनेमा, 'धर्मवीर'मधून दिघे साहेबांचा अपप्रचार', संजय राऊत संतापले

Gold-Silver : सोने-चांदीने गाठली उच्चांकी; वाचा आज कितीने वाढला भाव

Maharashtra Politics: 'चिंगम' राऊतांनी 'सिंघम' फडणवीसांची चिंता करू नये, भाजप नेता भडकला

SCROLL FOR NEXT