मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंनी संयुक्त वचननामा जाहीर केला
उद्धव ठाकरे यांचा शिंदे गटावर ३ हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या राजीनाम्याची मागणी
उद्धव ठाकरे यांनी भाजप, शिंदे गट आणि पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका
मुंबई महानगर पालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंनी 'शब्द ठाकरेंचा' हा वचननामा जाहीर केला. शिवसेना भवनात संयुक्त पत्रकार परिषद घेत त्यांनी वचननामा जाहीर केला. यानिमित्ताने राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर शिवसेना भवनात आले. वचननामा जाहीर करत असताना उद्धव ठाकरे यांनी भाजप, शिवसेना शिंदे गटासोबतच पीएम मोदींपर्यंत सर्वांवर निशाणा साधला. 'खोकासुरांनी ३ हजार कोटींचा घोटाळा केला.', असा आरोप उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केला. तसंच यावेळी त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
उद्धव ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधत सांगितले की, 'आपल्या देशात लोकशाही संपून झुंडशाही सुरू झाली आहे असे वातावरण आहे. आम्ही मतचोरी पकडल्यानंतर त्यांनी उमेदवारांची पळवापळवी सुरू केली. निवडणूक बिनविरोध करून घेण्याची प्रक्रिया हे राबवत आहे. राज्यात निगरगट्ट सरकार आहे. जिथे जिथे बिनविरोध निवड झाली आहे तिथे पुन्हा निवडणूक प्रक्रिया राबवली गेली पाहिजे. बिनविरोध निवड होणे हा लोकशाहीचा अपमान आहे. बिनविरोधामुळे नवमतदारांना मतदानापासून वंचित ठेवले जात आहे.'
उद्धव ठाकरे यांनी यावेळी राहुल नार्वेकर यांच्या राजीनामाच्याची मागणी केली. त्यांनी सांगितले की,'नार्वेकर स्वत:ला नायक चित्रपटातील अनिल कपूर समजत आहेत. राहुल नार्वेकर हे विधानसभा अध्यक्ष आहेत त्यांनी विधानभवनात राहावे. अध्यक्ष कोणत्याही पक्षाचे नसतात ते विधीमंडळाचे अध्यक्ष असतात. अध्यक्ष कोणत्याही पक्षाच्या प्रचारात जाऊ शकत नाहीत. त्याला छेद देणारे उद्दाम वर्तुन नार्वेकरांनी केले आहे. त्यांच्यावर कारवाई केली गेली पाहिजे. राहुल नार्वेकरांना तात्काळ विधानसभा अध्यक्षपदावरून निलंबित करा. नार्वेकरांचे वर्तन चुकीचे आहे. निवडणूक आयोगाने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत कारवाई करावी.'
उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्यावर ३ हजार कोटींच्या घोटाळ्याच्या आरोप केला. ते म्हणाले की, '३ लाख कोटींचा घोटाळा खोकासुराने केले आहे. वरळीच्या डोममध्ये काल डोम कावळे जमले होते. कैलास पर्वत मोदींनी बांधले आहे हे का नाही सांगत? समुद्र मंथन देखील मोदींनी केलं आहे. समुद्र मंथनातून शिवस्मारक बाहेर आणावं. त्यांनी आमच्या छोट्या कामाचं श्रेय घेऊ नये. आमच्या कामाचे श्रेय घेण्यापेक्षा स्वत:चे काम करा. गल्लीबोळ बांधले तरी हे टोल घेतात. ठेवी कंत्राटदारांचे बूट चाटायला नसतात.', असा टोला उद्धव ठाकरे यांनी सरकारला लगावला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.