Nitesh Rane Vs Sanjay Raut: saam tv
मुंबई/पुणे

Nitesh Rane News: माझगाव कोर्टाचा नितेश राणेंना धक्का! अजामीनपात्र वॉरंट जारी; संजय राऊतांवरील बदनामीकारक विधान भोवणार

Nitesh Rane Vs Sanjay Raut: शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी ऍड. मनोज पिंगळे यांच्यामार्फत भाजप आमदार नितेश राणे यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.

Gangappa Pujari

सचिन गाड, मुंबई|ता. ८ ऑगस्ट २०२४

भारतीय जनता पक्षाचे नेते, आमदार नितेश राणे यांना माझगाव कोर्टाने मोठा धक्का दिला आहे. खासदार संजय राऊत यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीचा दाव्याप्रकरणी नितेश राणे यांना कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले आहे. अटक टाळण्यासाठी नितेश राणेंना १७ ऑक्टोबरला न्यायालयात हजर राहावेच लागणार आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी ऍड. मनोज पिंगळे यांच्यामार्फत भाजप आमदार नितेश राणे यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. या प्रकरणात आता आमदार राणे यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. याप्रकरणी मंगळवारी झालेल्या सुनावणीला नितेश राणे यांनी दांडी मारली, त्यांच्या वकिलांनी हजेरीपासून सूट देण्याची विनंती केली.

मात्र खटल्यात वारंवार गैरहजर राहणाऱ्या नितेश राणे यांना दिलासा देण्यास प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आरती कुलकर्णी यांनी स्पष्ट नकार दिला व थेट अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. नितेश राणेंविरुद्ध यापूर्वीही अजामीनपात्र वॉरंट बजावले होते, त्यानंतरही नितेश राणे खटल्यात गांभीर्याने वागत नसल्याची नाराजी न्यायालयाने बोलून दाखवली.

दरम्यान, कोर्टाच्या या निर्णयामुळे या प्रकरणात अटक टाळण्यासाठी नितेश राणेंना १७ ऑक्टोबरला न्यायालयात हजर राहावेच लागणार आहे. १७ ऑक्टोंबरच्या सुनावणीत कोर्ट काय निर्देश देते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election : ऐन निवडणुकीत इंडिया आघाडीला जोरदार झटका, एका राज्यातील सत्ताधारी मित्रपक्ष फुटला

Maharashtra Politics: अजित पवारांच्या गटात बेशिस्तपणा वाढलाय; राष्ट्रवादीचा माजी आमदार भाजपात जाणार

Sunday Horoscope : तुम्ही यशाच्या अगदी जवळ जाणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात येणार टर्निंग पॉईंट

Maharashtra Live News Update : दगडूशेठ गणपती मंदिरावर फुलांची आकर्षक सजावट

टेस्ट, वनडे आणि टी-२० नंतर क्रिकेटमध्ये नव्या फॉरमॅटची एन्ट्री! कुठे आणि कधी होणार सुरूवात? नियम कोणते?

SCROLL FOR NEXT