shital tejwani news update  Saam tv
मुंबई/पुणे

शीतल तेजवानीच्या मुसक्या आवळल्या, गोरगरिबांच्या जमिनी हडपणाऱ्या मास्टरमाईंडचे काळे कारनामे समोर

shital tejwani News : जमीन व्यवहार प्रकरणात शीतल तेजवानीला मोठा दणका बसला आहे. या प्रकरणात तिला पुण्यातून अटक झाली आहे.

Akshay Badve

मुंढवा जमीन घोटाळ्याप्रकरणी मुख्य आरोपी शीतल तेजवानीला अटक

शासनाची जमीन परस्पर विक्री केल्याचा आरोप

तेजवानीच्या पती सागर सूर्यवंशीवरही फसवणुकीचे गुन्हे

पुण्यातील मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणातील प्रमुख आरोपी शीतल तेजवानीला अटक करण्यात आली आहे. तेजवानी ही मुंढवा जमीन प्रकरणात मुख्य सूत्रधार होती. पुणे पोलिसांनी याच तेजवानीला जमीन बेकायदेशीर विक्री आणि हडपल्या प्रकरणात बेड्या ठोकल्या आहेत. आता तेजवानीचे काळे कारनामे समोर येऊ लागले आहेत.

मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणातील आरोपी शीतल तेजवानीच्या अटक करण्याची कारणे देखील समोर आली आहेत. शासनाचे कोणतेही आदेश नसतानाही जमिनीचे मूळ वतनदार आणि वारसदारांकडून कागदपत्र तयार करून जमीन विक्री प्रकरणात फसवणूक केल्यामुळे अटक केल्याचे समोर आलं आहे. शीतलने शासनाची जमीन परस्पर विक्री करत थेट शासनाची फसवणूक केली .

तेजवानीने स्वतःच्या फायद्यासाठी जमीन विक्री केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. तेजवानीने मुंढवा येथील जमिनीचा ७/१२ बंद असतानाही व्यवहाराच्या वेळी जोडला. याच प्रकरणी शीतल तेजवानीच्या विरोधात खडक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय. या गुन्ह्याचा तपास पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. या प्रकरणाबाबत चौकशी करून पोलिसांनी तेजवानीकडे खुलासा मागितला होता.

कोण आहे शीतल तेजवानी?

शीतल तेजवानी ही पिंपरीची रहिवासी आहे. तिच्या नवरा सागर सूर्यवंशी याच्याविरोधातही फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. तिच्या विरोधात पिंपरी-चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सेवा विकास सहकारी बँकेची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत.

अटक केलेल्या तेजवानीच्या विरोधात सीआयडी आणि ईडीनेही कारवाई केली होती. तिला सहकारी बँकेच्या फसवणूक प्रकरणात अटक देखील झाली होती. शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणीही तिच्या विरोधात दोन गुन्हे दाखल झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: आठवड्याच्या सलग तिसऱ्या दिवशी सोनं महागलं; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Crime: सॉफ्टवेअर इंजिनीअरकडून बायकोची हत्या, भररस्त्यात धाडधाड गोळ्या झाडल्या

Maharashtra Live News Update : पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का, दोन माजी नगरसेवकांचा ही जय महाराष्ट्र

Akola : भाजप आमदाराचा नवा लूक, नगरपालिकेत यश खेचून आणलं अन्..., वाचा नेमकं काय झालं

Railway Recruitment: रेल्वेत सर्वात मोठी भरती! २२००० पदांसाठी भरती; अट फक्त १० वी पास; अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT