महाराष्ट्र परिवहन विभागाच्या निष्क्रीयतेविरोधात आणि गिग वर्कर्सच्या हक्कांसाठी १५ जुलै २०२५ रोजी आझाद मैदान, मुंबई येथे राज्यभरातील रिक्षा, कॅब आणि डिलिव्हरी कामगार एकत्र येऊन भव्य मोर्चा काढणार आहेत. स्विगी, झोमॅटो, ओला, उबर, रॅपिडो, अर्बन कंपनी या अॅप-आधारित कंपन्यांत काम करणाऱ्या हजारो गिग वर्कर्सनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
रिक्षा, कॅब आणि डिलिव्हरी कामगारांच्या प्रमुख मागण्या:
परिवहन विभागाच्या लाचारीविरोधात मुंबई, आझाद मैदानात रिक्षा आणि कॅब चालकांचा १५ जुलै २०२५ ला विशाल मोर्चा.
स्विगी, झोमॅटो, ओला, उबेर अर्बन कंपनीसारख्या एप्लीकेशनवर काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने, "महाराष्ट्र गिग वर्कर्स ऍक्ट", लागू करण्याची मागणी.
देशातील कोणतेच कायदे न पाळता रिक्षा, कॅब, बाईक टॅक्सी, बस तसेच बेकायदा चालवणाऱ्या ओला, उबर आणि ऱॅपिडोविरोधात कारवाईचे कागदोपत्री आदेश काढण्याशिवाय परिवहन विभाग काहीही करत नाही, असा आरोप.
परिवहन मंत्र्यांना रॅपिडो, बाईक टॅक्सी बंद असल्याचे परिवहन विभागाचे अधिकारी सांगतात. तरीदेखील रॅपिडोची बाईक टॅक्सी बिनधास्तपणे चालूये.
शासनाचे सर्व नियम पायदळी तुडवून सर्च प्राईसिंगद्वारे नागरिकांची व इतर वेळी प्रवाशांची लूटमार या कंपन्यांकडून होत आहे. आजतागायत या कंपनींना एक रुपयाचाही दंड लागलेला नाही.
चालकांनी मागणी न करता ओला उबेरवर दुप्पट भाडे घेऊ शकता, असा अजब नियम केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने काढला, तो सुद्धा फक्त या बेकायदा कंपन्यांच्या फायद्यासाठीच. आम्हाला दुप्पट भाडे नकोच, ही रिक्षा, कॅब चालकांची मागणी आहे.
नवीन रिक्षा परमिटबंदीचा प्रश्न केंद्र-राज्य यांच्यातील जबाबदारी झटकण्याच्या खेळात अडकलेला, आणि त्याचा फटका सामान्यांना बसतो.
पुण्यातून हजारो कामगारांचा सहभाग
या आंदोलनात पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, औरंगाबाद, नागपूर यासह राज्यभरातून हजारो रिक्षा, कॅब चालक आणि गिग वर्कर्स मुंबईच्या आझाद मैदानात दाखल होत आहेत. मोर्चात महिलांचाही मोठा सहभाग असून, अनेक कुटुंबंही समर्थनासाठी उपस्थित राहणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.