शिवसेना - मनसेची युती कधी होणार? उद्धव ठाकरेंनी सांगितला मास्टर प्लॅन | Maharashtra Politics

MNS-Shiv Sena Unity Possible After December: हिंदी सक्तीविरोधात झालेल्या मेळाव्यानंतर शिवसेना-मनसे युतीची शक्यता वर्तवली जात आहे. उद्धव ठाकरे सकारात्मक, तर राज ठाकरे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये निर्णय घेणार असल्याचं स्पष्ट केलं.
Raj-Uddhav Thackeray
Raj-Uddhav Thackeraysaamtv
Published On

हिंदी भाषा सक्तीविरोधात मिळवलेल्या विजयी मेळाव्यानंतर शिवसेना आणि मनसेमध्ये युतीचे वारे वाहत आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार का? हा प्रश्न सर्वांच्या मनात आहे. उद्धव ठाकरे यांनी औपचारीक गप्पांमध्ये युतीबाबत सकारात्मक असल्याचं स्पष्ट केलं. मात्र, राज ठाकरे यांनी सावध पवित्रा घेतला आहे. नोव्हेंबर डिसेंबर दरम्यान, चित्र स्पष्ट झाल्यानंतर युतीसंदर्भात बघू, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. त्यामुळे सध्या संभ्रमाचे वातावरण आहे.

विधान भवनाच्या आवारात उद्धव ठाकरेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मनसे - शिवसेना युतीबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी मनसेशी युतीबाबात सकारात्मक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. युतीबाबत टप्पा टप्प्यानं प्रक्रिया सुरू आहे, असं ठाकरेंनी स्पष्ट केलं. 'मेळाव्यानंतर ठाकरे एकत्र येऊ नये, यासाठी प्रयत्न झाले. इथून पुढेही होतील. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यावर युतीचा निर्णय होईल', असं उद्धव ठाकरेंनी अनौचारिक गप्पांमध्ये म्हटलं आहे.

Raj-Uddhav Thackeray
BJP Crime: पार्किंगवरून वाद चिघळला; भाजप नेत्यावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न; परिसरात खळबळ

उद्धव ठाकरे युतीबाबत सकारात्मक असल्याचं बोललं जात आहे. मात्र, राज ठाकरेंनी सावध पवित्रा घेतला असल्याचं दिसत आहे. इगतपुरी येथील अनौपचारिक गप्पांमध्ये राज ठाकरेंनी, नोव्हेंबर डिसेंबरदरम्यान चित्र स्पष्ट होईल, असं म्हटलं आहे. 'मराठी विजयी मेळावा हा मराठी भाषेच्या मुद्द्यावर होता. त्याच राज राजकारणाशी काहीही संबंध नाही. नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर युतीसंदर्भात बघू', असं अनौपचारिक गप्पांमध्ये राज ठाकरे म्हणाले. दरम्यान, एकीकडे उद्धव ठाकरे टाळी देत असताना, राज ठाकरेंनी अद्याप टाळीसाठी पुढाकार घेतला नसल्याचं चित्र आहे.

Raj-Uddhav Thackeray
मध्यरात्री हॉस्पिटलमध्ये मनसे नेत्याची दादागिरी; डॉक्टरला लाथाबुक्क्यांनी मारहाण; राड्याचा VIDEO व्हायरल

महाराष्ट्राच्या मनात जे काही आहे, ते आम्ही करू - आदित्य ठाकरे

'५ जुलैला आम्ही एकत्र आलो, ते फक्त एकाच गोष्टीसाठी, ती म्हणजे हिंदी भाषा सक्तीविरोधात. सध्या निवडणुकांचं वातावरण आहे. महाराष्ट्राच्या जे काही मनात आहे, ते आम्ही करू. आम्ही राजकारण पाहत नाही, महाराष्ट्राचं हित पाहतो', असं आदित्य ठाकरे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com