
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरात एक धक्कादायक प्रकार घडला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण जाधव यांनी मध्यरात्री गाभणे हॉस्पिटलमध्ये मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घालून, आयसीयूतील ज्युनिअर डॉक्टरला बेदम मारहाण केली. संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, या प्रकरणी मेहकर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मेहकर येथील गाभणे हॉस्पिटलमध्ये घडली. शनिवारी रात्री २.३० च्या सुमारास लक्ष्मण जाधव आपल्या काही मित्रांसह गाभणे हॉस्पिटलमध्ये गेले. लक्ष्मण जाधव यांचे नातेवाईक त्या रूग्णालयात उपचार घेत आहे. नातेवाईकाला भेटण्यासाठी ते मध्यरात्री हॉस्पिटलमध्ये पोहोचले.
लक्ष्मण आणि त्याचे मित्र मद्यधुंद अवस्थेत होते. तसेच मध्यरात्र सुरू होती. त्यामुळे ड्युटीवरील ज्युनिअर डॉक्टरने त्यांना नकार दिला. आयसीयूतील रुग्णांना विश्रांतीची गरज असते, त्यामुळे सर्वांना एकत्रित न देता एकेक करुन भेटण्याची परवानगी दिली जाईल, असं डॉक्टर म्हणाले. मात्र, यामुळे संतप्त झालेल्या जाधव यांनी आम्हा सर्वांना एकाच वेळी आत जाऊ द्या, अशी मागणी केली.
मात्र, डॉक्टरांनी एकत्र जाण्यास नकार दिला. संतप्त लक्ष्मण यांनी ज्युनिअर डॉक्टरवर हल्ला केला. डॉक्टरला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेची माहिती थेट पोलिसांना दिली. पोलिसांनी तपास करत सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं आहे. मेहकर पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. लवकरच आरोपीविरोधात गुन्हा दाखल होईल, असं पोलिसांनी सांगितलं. दरम्यान, मनसेच्या जिल्हाध्यक्षाने केलेल्या या वर्तणुकीवर तीव्र टीका होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.