Mumbai Fire News update  AI Photo
मुंबई/पुणे

Mumbai Fire : भल्या पहाटे विद्याविहारमध्ये आगीचं तांडव, एकाचा होरपळून मृत्यू, एकजण गंभीर

Mumbai Fire News update : पहाटे चार वाजता विद्याविहार स्थानकाजवळच्या इमारातलीला भीषण आग लागली, त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे समोर आलेय. अग्निशामन दलामुळे मोठी दुर्घटना टळली.

Namdeo Kumbhar

vvvvMumbai Vidyavihar Fire : मुंबईतील विद्याविहार स्थानकाजवळील इमारतीला भल्या पहाटे आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीमध्ये एका सुरक्षा कर्मचाऱ्याचा होरपळून मृत्यू झाला, तर दुसरा कर्मचारी गंभीर भाजला आहे. साखर झोपेत असताना पहाटे साडेचार वाजता आगीची घटना घडल्याचे सांगण्यात आलेय. या घटनेनंतर विद्याविहार स्थानक परिसरात एकच खळबळ उडाली.

विद्याविहार स्थानकाजवळील तक्षशिला (निलकंट कॉम्पेलेक्सजवळील) इमारतीला भीषण आग लागली. पहाटे ४ वाजून ३५ मिनिटांनी आग लागल्याचे अग्निशामन दलाने सांगितलेय. या आगीत एकाचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर एकजण ३० टक्के भाजला आहे, त्याच्यावर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहे. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून कुलिंगचे काम सुरू आहे.

विद्याविहार स्थानकाजवळ आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामन दल तात्काळ दाखल झाले. आगीवर निंयत्रण मिळवण्यासाठी अग्निशामन दलाकडून प्रयत्न करण्यात आले. दोन ते तीन तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. या आगीमध्ये सुरक्षा कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. एकावर राजावाडी रूग्णालयात उपचार सुरू आहे. मृत झालेल्या सुरक्षा कर्मचाऱ्याचे उदय गगण असे आहे, तर जखमी कर्मचाऱ्याचे नाव संभाजीत यादव असे आहे.

शॉर्ट सर्किटमुळे इमारतीला आग लागली. पण त्यानंतर इमारतीमधील फर्निचर, एसी, कपडे, शू रॅकेट अन् इतर साहित्यामुळे आग अधिकच भडकली. तक्षशिला इमारातीचे दोन मजल्यावर आग पसरली होती. ही १३ मजली इमारत आहे, यातील पहिल्या दोन मजल्यावर आग भडकली होती. आग अधिकच भडकण्याआधी अग्निशामन दलाने त्यावर नियंत्रण मिळवले. यादरम्यान २० जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. किरकोळ जखमी झालेल्यांना राजावाडी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बस आणि ट्रकचा भीषण अपघात, 10 ते 12 जण जखमी; महामार्गावरील घटनेनं खळबळ|VIDEO

Pune Traffic : वाघोलीतील वाहतूक कोंडीची कटकट कायमची संपणार, पोलिसांनी आखला प्लॅन, उपाय योजनाही सुरू

Fermented Rice Water: शिळे तांदळाचे पाणी प्यायल्यास शरीरावर कसे परिणाम होतात?

Ration Card: घरबसल्या रेशन कार्डमध्ये जोडा कुटुंबातील सदस्याचे नवीन नाव? जाणून घ्या प्रोसेस

Wardha Accident : वर्ध्यात भीषण अपघाताचा थरार; बस आणि ट्रेलरची धडक, वाहनांचा चक्काचूर

SCROLL FOR NEXT