Bhivandi Fire Saam Tv
मुंबई/पुणे

भिवंडीत अग्नितांडव! कापूर, अगरबत्तीच्या कंपनीसह कारखान्याला आग

ही आग नेमकी कशी लागली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bhivandi Fire : भिवंडीत (Bhivandi) येथे कापूर आणि अगरबत्तीच्या कंपनीसह कारखान्याला भीषण आग (Massive Fire)लागल्याची घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील सोनाळे गावाच्या गोदाम पट्यातील लक्ष्मी कंपाऊंड भागात घडली आहे. आज सकाळच्या साडे सहा वाजताच्या सुमारास कापूर आणि अगरबत्तीच्या कंपनीसह कारखान्याला भीषण आग लागली.

दरम्यान आगीच्या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी भिवंडी, कल्याण डोंबिवली, ठाणे महापालिकेच्या एकूण ५ ते ६ बंब दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरु असून आग आटोक्यात आणण्यासाठी आणखी ४ ते ५ तास लागल्याची शक्यता वर्तवण्यात आली.

या भीषण आगीच्या घटनेमुळे परिसरात धुराचे लोट पसरले आहे. या आगीत लाखोंचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या भीषण आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आणखी ४ ते ५ तास लागल्याची शक्यता अग्निशाम दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. असे असेल तर दिलासादायक बाब म्हणजे या आगीत अद्याप पर्यत कोणालाही दुखापत झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे. तर ही आग नेमकी कशी लागली याचे कारणंही समजू शकलेले नाही. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाकडून अथक प्रयत्न सुरु आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RBI FD Rules : तुमचीही बँकेत FD आहे का? १ ऑक्टोबरपासून लागू होणार 'हा' नवीन नियम; बँक खात्यावर थेट परिणाम

Pitru Paksha 2026: श्राद्धाच्या दिवशी कावळा दिसला नाही किंवा अन्नाला शिवला नाही? धार्मिक मान्यतेनुसार करा हा सोपा उपाय

Skin Care: रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावा ही नाईट क्रीम; स्किन होईल नॅचरल ग्लोईंग आणि स्मूद

Induction Vastu Tips: किचनमध्ये इंडक्शन कोणत्या दिशेला ठेवावा? वास्तुशास्त्रानुसार नियम जाणून घ्या

Maharashtra News Live Update: SIR संदर्भात काँग्रेसचे शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार

SCROLL FOR NEXT