Pune-Nashik highway Saam tv
मुंबई/पुणे

Accident News: पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; लक्झरी बसची कंटेनरला मागून धडक, ४०-५० प्रवासी गंभीर जखमी

Pune-Nashik highway: ठाणे-बेलापूर मार्ग आणि पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात झाले असून, वाहनचालकांचे वेगावरील नियंत्रण सुटल्याने दोन वेगळ्या घटनांमध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनांनी परिसरात खळबळ माजवली आहे.

Dhanshri Shintre

ठाणे-बेलापूर मार्गावर आणि पुणे-नाशिक महामार्गावर या दोन भीषण अपघातांच्या घटनांनी खळबळ उडवली आहे. या दोन्ही दुर्घटनांमध्ये अनेक जखमी असून वाहनचालकांच्या वेगावरील नियंत्रण सुटल्याने हे अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ठाणे बेलापूर मार्गावर डंपर थेट उड्डाणंपुलावरून खाली पडल्याची बातमी आहे.

पुणे-नाशिक महामार्गावर आळेफाटा बायपासजवळ लक्झरी बस आणि कंटेनरमध्ये झालेल्या भीषण अपघाताने अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. पुण्याकडे जाणारी लक्झरी बस पुढे जात असलेल्या कंटेनरला मागून धडकली. या अपघातात बसमधील 40 ते 50 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना तातडीने उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. धडक एवढी जोरदार होती की, बसचा पुढील भाग पूर्णपणे चिरडला गेला असून, घटनेमुळे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.

दरम्यान, ठाणे-बेलापूर मार्गावरील रबाळे उड्डाणपुलावरून एक डंपर थेट खाली कोसळला. हा डंपर खालील रस्त्यावर जोरात आदळल्याने मोठा आवाज झाला आणि घटनास्थळी गोंधळ उडाला. या अपघातात दोन जण जखमी झाल्याचे समजते. डंपरच्या चालकाचे वेगावर नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

या दोन्ही अपघातांमुळे सुरक्षित वाहनचालना आणि वेगावर नियंत्रण ठेवण्याचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. पोलिसांनी दोन्ही घटनांमध्ये तपास सुरू केला असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. या दुर्घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात असून जखमींच्या लवकर बऱ्या होण्यासाठी प्रार्थना केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT