Accident News: राज्यात एकाच वेळी अपघाताच्या ४ घटना, चार जणांचा मृत्यू, ५ जण गंभीर जखमी

Accident In Pune and sion-panvel Road: पुण्यात फुरसुंगी येथील पावर हाऊसजवळ पहाटेच्या सुमारास स्विफ्ट कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला.
Accident News
Accident NewsSaam tv
Published On

पुण्यातील फुरसुंगी येथे पावर हाऊसच्या जवळ पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. स्विफ्ट कार आणि कंटेनर यांच्यात झालेल्या या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव अक्षय चिवे आहे. अपघात इतका भीषण होता की स्विफ्ट कारचा चालक जागीच ठार झाला. अपघाताचा मोठा आवाज ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले. याप्रकरणी काळेपडळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस अधिक तपास करत आहेत. या अपघातामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

तसेच, कर्नाटकातील रायबाग रोडवर भीषण अपघात झाला असून, या अपघातात मिरजचा रहिवासी समीर शेख याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर फिरोज उर्फ बाबू रोहिले गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने चिकोडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. समीर शेख हा इब्राहिम चौधरी यांच्या खुनातील मुख्य आरोपी होता आणि त्याला सात वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. मात्र, तो महिनाभरापूर्वी जामीनवर सुटला होता. त्यानंतर कर्नाटकमध्ये झालेल्या या अपघातात त्याचा मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे स्थानिकांमध्ये चर्चा सुरू असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.

Accident News
MHADA News: खुशखबर! म्हाडाच्या ६४२० घरांसाठी आज निघणार सोडत; ऑनलाइन पद्धतीने होणार घोषणा

दरम्यान, अकोट मार्गावर दोन दुचाकींचा भीषण अपघात झाला असून, या दुर्घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले आहेत. अकोला-अकोट मार्गावरील पळसोद फाट्याजवळ साई जिनसमोर हा अपघात रात्री उशिरा घडला. दोन्ही दुचाकींमध्ये जोरदार धडक होऊन काही जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच दहीहंडा पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने अकोल्यातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, अद्याप मृतक आणि जखमींची ओळख पटलेली नाही. या अपघातामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

Accident News
Navi Mumbai: सायन-पनवेल मार्गावर दोन रिक्षा आणि एका कारचा भीषण अपघात, एका रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू

सायन पनवेल मार्गावर जुईनगर स्थानकाच्या समोर आज पहाटे सहा वाजता एक भीषण अपघात घडला आहे. मुंबईच्या दिशेने जात असताना दोन रिक्षा आणि एक कार यामध्ये विचित्र अपघात झाला. अपघाताच्या घटनेत एका रिक्षा चालकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सायन पनवेल महामार्गावर जुईनगर येथे ही घटना घडली, जिथे दोन रिक्षा प्रवाशांची वाट पाहत उभ्या होत्या.

Accident News
Maharashtra Weather: राज्याच्या हवामानात चढ-उतार; राज्यभर रात्री-पहाटे थंडी, दिवसा उकाडा

दरम्यान, त्याचवेळी एक होंडा सिव्हिक कार भरधाव वेगाने आली आणि उभ्या असलेल्या दोन्ही रिक्षांना जोरदार धडक दिली. होंडा सिव्हिकच्या चालकाचा गाडीचा नियंत्रण सुटला आणि दोन्ही रिक्षांवर जोरदार धडक दिल्याने एक रिक्षा चालक रिक्षामध्येच अडकला. यामध्ये त्याची मृत्यू झाला. मृत रिक्षा चालकाचे नाव घनश्याम यादव आहे.

Accident News
Pimpri-Chinchwad: पिंपरी चिंचवड शहरात पहिला तृतीयपंथीयांचा सामुदायिक विवाह सोहळा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com