Pimpri-Chinchwad: पिंपरी चिंचवड शहरात पहिला तृतीयपंथीयांचा सामुदायिक विवाह सोहळा

Pimpri-Chinchwad Pune News: उद्योगनगरी आणि कामगार नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरात पहिल्यांदाच तृतीयपंथीयांचा सामूहिक विवाह सोहळा पार पडला. हा सोहळा तृतीयपंथीयांच्या विवाहाच्या हक्काची मान्यता देणारा आणि समाजातील समतेचा संदेश देणारा ठरला.
Pimpri-Chinchwad
Pimpri-Chinchwadsaam tv
Published On

पिंपरी चिंचवड शहर, जे उद्योगनगरी आणि कामगार नगरी म्हणून ओळखलं जातं, येथे पहिल्यांदाच तृतीयपंथीयांचा सामूहिक विवाह सोहळा पार पडला आहे. तृतीयपंथीयांना विवाहाचा हक्क मिळावा आणि त्यांना देखील विवाहाचे स्वप्न साकार व्हावे, या उद्देशाने 'परिवर्तनाचा पांयडा' या पिंपरी चिंचवड येथील 'नारी द वुमन' संस्थेने एक ऐतिहासिक पाऊल उचललं आहे.

या सामूहिक विवाह सोहळ्यात पाच तृतीयपंथीय जोडप्यांनी आपला जीवनसाथी स्वीकारला आणि विवाहाच्या गाठी बांधल्या. तृतीयपंथीय वधू-वरांसाठी हा विवाह सोहळा एक विशेष पर्व ठरला, कारण त्यांना देखील समाजात इतरांसारखा विवाह करण्याचा संधी मिळाली. या सोहळ्यात सर्व पारंपारिक आणि धार्मिक विधी पूर्ण करण्यात आले, ज्यात हळदी समारंभ, साखरपुडा, वरात, वऱ्हाडी मंडळी, सप्तपदी, कन्यादान आणि संसार उपयोगी साहित्याची भेट अशा सर्व गोष्टींचा समावेश होता. हे सर्व उत्साहात, नाचत आणि गात पार पडले.

Pimpri-Chinchwad
Navi Mumbai: सायन-पनवेल मार्गावर दोन रिक्षा आणि एका कारचा भीषण अपघात, एका रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांना विवाहयोग्य साथीदारासोबत सुखी संसार सुरू करण्याची संधी देण्यासाठी हा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला. अनेक तृतीयपंथीय व्यक्ती समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याचा विचार करत असतात, आणि त्यांच्या जीवनात हा क्षण एक महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरला आहे.

Pimpri-Chinchwad
Maharashtra Weather: राज्याच्या हवामानात चढ-उतार; राज्यभर रात्री-पहाटे थंडी, दिवसा उकाडा

या विवाह सोहळ्यात भाग घेतलेल्या तृतीयपंथीय वधू-वरांनी त्यांच्या आयुष्यातील मोठं स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त केला. समाजाने त्यांना समान हक्क आणि सन्मानाने स्वीकारल्यामुळे, हा सोहळा त्यांच्यासाठी एक ऐतिहासिक आणि प्रेरणादायक घटना ठरली. ह्या घटनेने समतेच्या दृषटिकोनातून एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे, ज्यामुळे तृतीयपंथीयांना समाजात समान स्थान मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

Pimpri-Chinchwad
MHADA News: खुशखबर! म्हाडाच्या ६४२० घरांसाठी आज निघणार सोडत; ऑनलाइन पद्धतीने होणार घोषणा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com