Maharashtra HSC Exam  saam tv
मुंबई/पुणे

HSC Board Exam: ३४ कर्मचाऱ्यांचे निलंबन, २७ जणांवर गुन्हे, बारावी परीक्षेदरम्यान बोर्डाची मोठी कारवाई

Mass Cheating During HSC Exam: बारावीच्या परीक्षेदरम्यान कॉपी केल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या. या प्रकरणी आता बोर्डाने मोठी कारवाई केली आहे. ४ कर्मचाऱ्यांचे निलंबन, २७ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Priya More

Summary -

  • राज्यभरात १०९ कॉपी प्रकरणे उघडकीस आली

  • ३४ कर्मचारी निलंबित, २७ जणांवर गुन्हा दाखल

  • वाशीम आणि बीड जिल्ह्यात गंभीर प्रकार समोर आला

  • कॉपीमुक्त अभियानासाठी सोशल मीडिया आणि सीसीटीव्हीचा वापर

राज्यात बारावी परीक्षा दरम्यान बोर्डाने मोठी कारवाई केली आहे. सामूहिक कॉपी प्रकरणी ३४ कर्मचारीवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. २७ कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून निलंबन कारवाईसाठी प्रस्ताव देण्यात आला आहे, अशी माहिती बोर्डाचे अध्यक्ष नंदकुमार बेंडसे यांनी दिली आहे. बारावीच्या परीक्षेदरम्यान कालपर्यंत १०९ कॉपीची प्रकरणं राज्यभरात दाखल झाले आहेत. पुण्यात २७, नागपूरमध्ये ११, छत्रपती संभाजीनगरमध्ये ६, अमरावतीमध्ये ५०, नाशिकमध्ये ४ आणि लातूरमध्ये ११ ठिकाणी कॉपीची प्रकरण समोर आली आहेत.

२६ जणांचे निलंबन

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत वाशीम जिल्ह्यातील श्री मैनागिरी महाराज विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय टो-जुमडा येथे सामूहिक कॉपी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. राज्य मंडळाने आणि जिल्हा दक्षता समितीने या प्रकरणात कठोर कारवाई केली आहे. या प्रकरणी २६ जणांचे निलंबित करण्यात आले असून त्यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. बारावीच्या भौतिकशास्त्र विषयाच्या पेपरदरम्यान वाशीम जिल्ह्यातील श्री. मैनागिरी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय टो-जुमडा या परीक्षा केंद्रावर भौतिकशास्त्र विषयाचा पेपर सुरू असतानाहा प्रकार घडला होता.

बीडमध्येही कॉपीचा प्रकार उघड

बीडच्या गेवराई तालुक्यातील पाडळसिंगी येथे बारावीची परीक्षादरम्यान कॉपी करतानाचा व्हिडिओ समोर आला होता. दगडाला बांधून कॉफी वर्गामध्ये टाकतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. एकीकडे जिल्हाधिकारी यांनी कॉपी मुक्त अभियान राबवले आहे. प्रत्येक वर्गामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत, असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. मात्र याच ठिकाणी काही तरुण कॉफी देत असतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यामुळे खळबळ उडाली.

राज्यात कॉपीमुक्त अभियान राबवले जाणार

सोशल मीडियाचा वापर विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना योग्य संदेश पाठवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर करण्यात आला आहे. ३३ हजार शिक्षक, कर्मचारी, मुख्याध्यापक यांना कॉपीमुक्त अभियान संदर्भात ई-मेल, एसएमएस, व्हाट्सअप ब्लकद्वारे कळविण्यात आले आहे. संवेदनशील १९१ केंद्र कॉफी मुक्त अभियान अंतर्गत संदेश देण्यासाठी समाजातील मान्यवरांचे व्हिडिओ मंडळाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. राज्यातील ५५४ परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही नाहीत. ३ हजार ८१९ विद्यार्थी यावेळेस परीक्षेसाठी बसले आहेत. राज्यातील कॉपी प्रकरणात ३१ केंद्र बंद करण्यात आली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Paper Leak: मोदींची 'फास्ट ट्रॅक कोर्ट'ची घोषणा, राहुल गांधींचा पलटवार; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासह केल्या 'या' ३ मोठ्या मागण्या

ITR Filing 2026: 31 जुलैपर्यंत ITR भरला नाही तर मोठा आर्थिक फटका; प्रत्येक करदात्याने ही बातमी एकदा वाचाच

Bollywood Actress Wedding : शुभमंगल सावधान! प्रसिद्ध अभिनेत्री चढली बोहल्यावर; नवऱ्यासाठी केली खास पोस्ट, पाहा लग्नाचे PHOTOS

Maharashtra News Live Update: यंदाच्या पावसाळ्यात पंचगंगा नदी दुसऱ्यांदा पात्राबाहेर

पाण्याचा एक थेंबही न घालता बनवा कुरकुरीत 'खेकडा भजी', चव एवढी भारी की न खाणारेही खातील

SCROLL FOR NEXT