Crime News डोंबिवलीत खळबळ! लग्नाचं आमिष दाखवून महिलांना लुटणारा सराईत गुन्हेगार गजाआड; उत्तर प्रदेशातून ठोकल्य बेड्या.jpg meta ai
मुंबई/पुणे

Crime News : डोंबिवलीत खळबळ! लग्नाचं आमिष दाखवून महिलांना लुटणारा सराईत गुन्हेगार गजाआड; उत्तर प्रदेशातून ठोकल्या बेड्या

Dombivali Crime: लग्नाचं आमिष दाखवून अनेक महिलांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी डोंबिवली पोलिसांनी सराईत आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक केली. आरोपीविरुद्ध विविध गुन्ह्यांचा तपास सुरू असून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Saam Tv

संघर्ष गांगुर्डे/साम टीव्ही न्युज/डोंबिवली

डोबिंवलीतून फसवणुकीची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. महिलांची आर्थिक फसवणुक करून कोटयावधी रूपयांना लुटणारा गुन्हेगार पोलिसांच्या तावडीत अखेर सापडला आहे. मॅट्रिमोनिअल वेबसाइट्स आणि वृत्तपत्रांमधील विवाह जाहिरातींचा वापर करून विधवा, घटस्फोटीत आणि एकट्या राहणाऱ्या महिलांना लग्नाचे आमिष दाखवत कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या सराईत भामट्याला डोंबिवली विष्णुनगर पोलिस आणि वसई- विरार पोलिसांच्या पथकाने उत्तर प्रदेशातून अटक केली आहे. अनुज संतोष तिवारी उर्फ अनुजकुमार त्रिवेदी वय ४८ वर्ष असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शादी डॉट कॉम, मॅट्रिमोनिअल डॉट कॉम तसेच वृत्तपत्रांमधील विवाह जाहिरातींच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम, विधवा, घटस्फोटीत किंवा एकट्या राहणाऱ्या महिलांशी संपर्क साधत असे. उच्चशिक्षित, श्रीमंत असल्याचे भासवत महिलांचा विश्वास संपादन करायचा. लग्नाचे आमिष दाखवत तो महिलांची आर्थिक फसवणूक करत होता. आरोपीने जवळपास चार खोट्या नावांचा वापर करत २५ हून अधिक महिलांना आपल्या जाळ्यात ओढले होते.

तपासादरम्यान, आरोपीने ७३ वर्षीय एका वृद्ध महिलेशी जवळीक निर्माण करून तिच्या घरातील दागिने चोरल्याचे उघड झाले आहे. त्यानंतर तिच्याच नावावर सिम कार्ड काढून पुण्यात उच्चभ्रू सोसायटीत घर घेण्याचे आमिष दाखवत तिला स्वतःचे राहते घर विकण्यास भाग पाडले आणि तब्बल ५७ लाख रुपये हडप केले.

ओळख लपवण्यासाठी आरोपी दुसऱ्या महिलेच्या नावावरील सिम कार्डचा वापर करत होता. अनेक महिलांना लग्नाचे आश्वासन देत त्यांच्याकडून दागिने, रोख रक्कम आणि कर्जाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे. एका प्रकरणात महिलेचे लैंगिक शोषण केल्याचाही आरोप त्याच्यावर आहे.

फसवणुक झाल्याचे लक्षात येताच पीडीत महिलांनी तात्काळ पोलिस ठाण्यात धाव घेतली. यानंतर या आरोपीचा शोध घेण्यासाठी विष्णुनगर पोलीस गेल्या वर्षभरापासून प्रयत्न करत होते. अखेर उत्तर प्रदेशातून त्याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये आरोपीविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. देशभरात आणखी किती महिलांना त्याने अशाच प्रकारे गंडा घातला आहे, याचा सखोल तपास विष्णुनगर पोलीस करत आहेत.

शरद पवारांनी पत्र लिहून मदतीची मागणी करणं अनपेक्षित; रविंद्र चव्हाणांचा टोला|VIDEO

दिशा सालियन प्रकरणात ठाकरेंनी सत्तेचा गैरवापर केला? तपास यंत्रणेवर काय म्हणाले भाजप प्रदेशाध्यक्ष?

BSNL Recharge Plan: फक्त १ रुपयात २४ दिवसांचा रिचार्ज प्लॅन; २४GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग, जाणून घ्या फायदे

Banana Vs Pomegranate Fruit Benefits: केळी खावी की डाळिंब? डॉक्टरांच्या मते 'हे' फळ देतं शरीराला दुप्पट ताकद; पाहा आश्चर्यकारक फायदे

Maharashtra News Live Update: 7 वर्षांनी बेपत्ता लेक घरी परतला! आई-वडिलांच्या आनंदाश्रूंनी फुललं घर

SCROLL FOR NEXT