governor cp radhakrishnan Saam tv
मुंबई/पुणे

Marathi Language Controversy : तुम्ही मारहाण केल्याने मी लगेच मराठीत बोलेल का? भाषावादावर राज्यपालांचं मोठं भाष्य, VIDEO

Governor on Marathi Language Controversy update : भाषावादावर सीपी राधाकृष्णन यांनी मोठं भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी जुना किस्सा सांगितला.

Vishal Gangurde

महाराष्ट्रात मराठी विरुद्ध हिंदी वाद उफाळला आहे. या वादावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. मराठी विरुद्ध हिंदी भाषा वादावर राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी मोठं भाष्य केलं आहे. भाषावादामुळे महाराष्ट्राला आर्थिक फटका बसेल. भविष्यात मोठ्या नुकसानाला सामोरे जावं लागेल. सर्व मातृभाषेचा सन्मान करायला हवा, असं राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी तामिळनाडूतील जुना किस्सा देखील सांगितला.

राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी भाषावादावर मोठं भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी खासदार असताना घडलेली गोष्ट सांगितली. राधाकृष्णन म्हणाले, 'मी तामिळनाडूत खासदार होतो. त्यावेळी हायवेवर काही लोक मार खात होते. त्यावेळी चालकाला गाडी थांबवायला सांगितली. त्यानंतर मी गाडीतून उतरलो. मला बघून मारहाण करणारे लोक पळून गेले. तर मार खाणारे लोक थांबले. त्यावेळी मार खाणाऱ्या लोकांची विचारपूस केली. त्यावेळी ते हिंदीत बोलत होते. पण त्यांचं बोलणं कळत नव्हतं. मी हॉटेल मालकाला बोलावून घेतलं. 'त्यांना तामिळ येत नाही, ते लोक त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्याशी फक्त तामिळमध्येच बोलायला सांगत होते, असं हॉटेल मालकाकडून समजलं.

राधाकृष्णन पुढे म्हणाले, 'तुम्ही मला मारहाण कराल. तर मी मराठीत बोलेल का? ही बाब मुळीच शक्य नाही. मी त्यांची माफी मागितली. त्यांना जेवण करण्यासाठी पैसे दिले. त्यांना गाडीत बसवून दिल्यानंतर पुढे गेलो'.

'भाषावादानंतर गुंतवणूकदार राज्यात गुंतवणूक करायला येणार नाहीत. त्यामुळे महाराष्ट्राचं मोठं नुकसान होईल, अशी भीती देखील त्यांनी व्यक्त केली. तुम्ही द्वेष पसरवत असाल, तर राज्यात गुंतवणूक करायला येईल. त्यामुळे नवीन उद्योग येणार नाही. याचं महाराष्ट्राला मोठं नुकसान होईल, असेही त्यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup मध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड,सलग चौथा विजय; नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव

Crime: १३ वेळा चाकूने वार करत महिलेला संपवलं, नंतर आरोपीने धावत्या ट्रेनसमोर उडी मारली

Crime News: 'तो घरी परत यायला नको'; नवऱ्याला रस्त्यातून हटवण्यासाठी प्रियकरासोबत बायकोनं रचला भयानक कट

Shocking: बड्या राजकीय नेत्याच्या मुलाचा एन्काऊंटर, पोलिस अधिकाऱ्यावर केला होता गोळीबार

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

SCROLL FOR NEXT