GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

Jantar Mantar Clash: जंतर-मंतरवरील आंदोलनात झालेल्या लाठीचार्जवरून नवा वाद पेटण्याची चिन्हे आहेत. आता या प्रकरणात आंदोलनादरम्यान जखमी झालेल्या पोलिसांच्या कुटुंबियांनी उडी घेतलीये. तर दुसरीकडे आंदोलकांवर गुन्हे नोंदवण्याचा धडाका सुरू झालाय. त्यामुळे सरकार आणि सीजेपीत नवा संघर्ष पेटण्याची चिन्ह आहेत...पाहूयात यावरचा विशेष रिपोर्ट...
Clashes during Jantar Mantar protest spark controversy as police action and political reactions intensify.
Clashes during Jantar Mantar protest spark controversy as police action and political reactions intensify.saam tv
Published On

कॉक्रोच जनता पार्टीच्या जंतमंतरवरील आंदोलकांवर कारवाईच्या हालचालींनी आता जोर धरलाय. त्यामुळे सरकार आणि सीजेपीमध्ये आणखी संघर्ष पेटण्याची चिन्ह आहेत. त्यात य़ा आंदोलकांच्या विरोधात दिल्ली पोलिसांच्या कुटुंबीयांनीही उडी घेतलीय. जखमी पोलिसांच्या कुटुंबीयांनी थेट पत्रकार परिषद घेऊन काही आंदोलकांनी दगडफेक केल्याचा आरोप केलाय. तर सरकार पोलिसांच्या कुटुंबीयांना पुढे करत असल्याचा पलटवार सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपकेंनी केलाय.

आंदोलकांवरील गुन्हा मागे घेण्याचं लेखी आश्वासन सरकारनं दिलं होतं. मात्र अनेक आंदोलकांवर नव्यानं गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोप सीजेपीनं केलाय. जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान 25 वर्षीय रुचिका सिंहने पंतप्रधानांवर टीका केली होती. याप्रकरणी नोएडात झिरो एफआयआर नोंदवण्यात आलाय. त्यामुळे सीजेपी प्रवक्ता सौरव दासनं पोलिसांवर जोरदार टीका केलीय.

रुचिका सिंहविरोधात फौजदारी कलमांचा वापर करणे पूर्णपणे गैर आहे. केवळ शिवीगाळ करणे हे कोणत्याही फौजदारी खटल्याचा आधार ठरू शकत नाही. जवळपास 50 टक्के लोकसभा खासदारांवर गुन्हेगारी खटले दाखल आहेत. त्यापैकी सुमारे 100 खासदार भाजपचे आहेत. पोलिसांनी एका तरुणीवर आपली ऊर्जा खर्ची करण्यापेक्षा या खासदारांच्या प्रकरणांवर करावी. तरुणांचा छळ तात्काळ थांबला पाहिजे.

आता जखमी पोलिसांच्या कुटुंबीयांनी यात उडी घेतल्यामुळे सरकार आणि सीजेपीतला संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. कारण आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरूच न केल्याचा आरोप सीजेपीनं केलाय. त्यात नव्यानं गुन्हे दाखल होत असल्यामुळे सीजेपी पुन्हा आंदोलन करणार की काय याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com