MNS Mumbai Breaking News: वैदेही काणेकर
मुंबई/पुणे

MNS Mumbai: मराठी पाट्यांबाबत मनसेचा खळखट्याक! गुजराती दुकानांवर लावल्या मराठी पाट्या

MNS Mumbai: मुंबईच्या बोरीवली भागात मनसेने अनेक गुजराती दुकानांबाहेर मराठी पाट्या लावल्या.

वैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: मराठी भाषेवरुन राज्यात राजकारण नेहमीच तापत असतं. आता राज्य सरकारने महाराष्ट्रतील दुकानांची नावे हे मराठीतर हवेत असा निर्णय घेतला. त्यानंतर राज्यात श्रेयवादाची लढाई सुरु झाली. राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही (MNS) मराठीसाठी अनेक आंदोलनं केली आहे. आता पुन्हा एकदा मनसेच्या कार्यकर्त्यांनी खळखट्याक करत मुंबईतील अनेक गुजराती दुकानांबाहेर मराठी पाट्या (marathi sign board) लावल्या आहेत. मुंबईच्या बोरीवली भागात मनसेने अनेक गुजराती दुकानांबाहेर मराठी पाट्या लावल्या.

हे देखील पहा -

मराठी पाट्यांच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक झाली आहे. बोरिवली पश्चिम येथील गुजराती नाव असलेल्या दुकानाच्या बाहेर मराठी पाटी लावून महाराष्ट्र सैनिकांनी निषेध व्यक्त केला आहे. तसेच मराठीमधूनच पाटी लावण्यासंदर्भात मनसेने दुकानदारांना आवाहन केले आहे. मराठी पाट्यासंदर्भात निर्णय आल्यानंतर राज ठाकरेंनी सरकारवरचे अभिनंदन केले होते, परंतु मराठीसाठीचा संघर्ष हा मनसेने आणि महाराष्ट्र सैनिकांनी केला आहे, त्यामुळे त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न कुणीही करु नये असा इशारा राज ठाकरेंनी विरोधकांना दिला होता. त्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि मराठी पाट्यांसाठी आंदोलन केले.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

अमरावतीत भीषण अपघात! हायड्रा क्रेनने ५ जणांना उडवले; तिघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

Veg Kolhapuri Recipe: सुट्टीच्या दिवशी घरच्या घरी बनवा धाबा स्टाईल झणझणीत व्हेज कोल्हापुरी, वाचा खास रेसिपी

Bedsheet Washing Tips: उन्हाळ्याच्या दिवसात बेडवरील चादर किती दिवसात धुतली पाहिजे?

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात खा नाचणीचा डोसा, चवही भन्नाट अन् आरोग्यही राहील उत्तम

SCROLL FOR NEXT