railway  Saam tv
मुंबई/पुणे

Marathi Language Controversy : हिंदीत बोला, मराठी समजत नाही; प्रवाशाच्या तक्रारीवर रेल्वे अधिकाऱ्याचं अजब उत्तर, कुठे घडला प्रकार?

Palghar railway station : प्रवाशाच्या तक्रारीवर रेल्वे अधिकाऱ्याने अजब उत्तर दिलं आहे. त्यामुळे आता या अधिकाऱ्यावर रेल्वे काय कारवाई करते, हे पाहावे लागेल.

Vishal Gangurde

पालघर रेल्वे स्थानकात रेल्वे अधिकाऱ्याकडून मराठी भाषेला दुय्यम वागणूक

प्रवाशाला 'हिंदीत बोला' असे सांगितल्याने संताप.

मराठी एकीकरण समितीने आंदोलनाचा इशारा

संजय गडदे,साम टीव्ही

मुंबई : महाराष्ट्राच्या राजधानीतच मराठी भाषेला दुय्यम वागणूक दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुंबई पश्चिम रेल्वे मार्गावरील पालघर स्थानकात हा प्रकार घडला. याप्रकरणी पश्चिम रेल्वेतील एका अधिकाऱ्याने तक्रार नोंदवणाऱ्या प्रवाशाला 'हिंदीत बोला, मराठी समजत नाही' असे उत्तर दिल्याने मराठी प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

मराठी एकीकरण समितीचे पदाधिकारी विवेक सरवनकर यांना हा अनुभव आला आहे. रेल्वे संबंधित समस्येसाठी त्यांनी अधिकाऱ्याशी संपर्क साधला. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्याने मराठी ऐकून दुर्लक्ष केले आणि फक्त हिंदीत तक्रार करा, असा सल्ला दिला. “मग आम्ही महाराष्ट्र सोडायचं का?” असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.

राज्य शासनाने जिथे मराठी भाषेला मानाचा दर्जा दिला आहे, तिथेच केंद्र सरकारच्या यंत्रणेमध्ये अशाप्रकारचा भेदभाव होत असल्याने नागरिक मनापासून व्यथित झाले आहेत. सरवनकर यांनी सांगितले, 'रेल्वे ही लाखो मराठी प्रवाशांची दैनंदिन गरज आहे. तिथेच जर आमच्या मातृभाषेला अपमानित केलं जात असेल, तर ही बाब अत्यंत गंभीर आहे. आम्ही या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा देत आहोत.'

मराठी एकीकरण समितीने आंदोलनाचा इशारा दिला

सदर प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. मराठी एकीकरण समितीच्या तक्रारीनंतर रेल्वे काय भूमिका घेते, हे पाहावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Green Chilli Halwa: हिरव्या मिरचीचा हलवा कधी खाल्लाय का? अंकिता लोखंडेने शेअर केली खास रेसिपी

Maharashtra Live News Update: धुळ्यात तापमानाचा पारा 6.2°c वर

Kitchen Hacks : हिरव्या मिरच्या कापल्यावर हातांची आगआग होते? मग फॉलो करा हे घरगुती उपाय

Pune Crime: क्लासेसमध्ये रक्तरंजित थरार! शिक्षक शिकवत असताना चाकूहल्ला, विद्यार्थ्याने मित्राचा गळा चिरला

Hajmola Tea Recipe: बनारस स्टाईल हाजमोला चाय रेसिपी, ५ मिनिटांत घरीच बनवा

SCROLL FOR NEXT