Avinash Jadhav MNS Leader  Saam Tv
मुंबई/पुणे

Avinash Jadhav: मतांसाठी मराठी आणि गुजरातीचा वाद निर्माण केला; मनसेची ठाकरे गटावर टीका

Avinash Jadhav: मनसे नेते अविनाश जाधव आज भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन उद्घाटनासाठी आले होते यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिजित देशमुख

कल्याण: मुंबईत मराठी आणि गुजराती वादावरून मनसे नेते अविनाश जाधव यांनी ठाकरे गटावर हल्लाबोल केलाय. पराभव दिसत असल्याने ते असा प्रचार करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. मनसे नेते अविनाश जाधव आज भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन उद्घाटनासाठी आले होते यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

ठाकरे गटावर आरोप करताना अविनाश जाधव म्हणाले, ही देशाची निवडणूक आहे, प्रत्येक नागरिक त्यांच्या भाषेत प्रचार करतो, या वेळेला देशाचा विचार केला पाहिजे. देशहिताच्या गोष्टी समोर आणल्या पाहिजे. उबाठा जे काही करत आहे त्यांना पराभव समोर दिसतोय, ज्यावेळेला पराभव समोर दिसतो त्यावेळेला, अशा प्रकारच्या प्रचाराला सुरुवात केली जाते.

आम्ही हिंदुत्वाची भाषा घेतली, जिथे मराठी माणसावर अन्याय होईल जिथे मराठी माणसाचा अपमान होईल तिथे मनसे मराठी माणसासोबत उभी असणार. मत पाहिजेत म्हणून मराठी आणि गुजराती याचा वाद निर्माण केलाय. याच्या आधी ज्या वेळेला मराठी माणसांना घरी मिळत नव्हते घरात नॉनव्हेज बनवायचे नाही असं सांगितलं जायचं त्या वेळेला आंदोलने झाली.

त्यावेळेला उद्धव ठाकरे कुठे होते. मराठी गुजराती वाद हा निवडणुकीसाठी आहे. मतांसाठी आहे मराठी माणूस आणि गुजराती माणूस हे दोघे होते. एवढेच हुशार आहेत त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत असे मनसे नेते अविनाश जाधव यांनी सांगितले.

दरम्यान श्रीकांत शिंदे आणि कपिल पाटील याचा प्रचार करताना अविनाश जाधव म्हणाले, ज्यांच्यावर मोदींचा आशीर्वाद तो पडू शकत नाही ,कल्याण आणि भिवंडी दोन्ही मतदारसंघ युतीसाठी सुपीक आहेत. दोन्ही उमेदवारांनी उत्तम काम केलं दोन्ही उमेदवारांवर मोदींचा आशीर्वाद आहे ,या देशात ज्यांच्यावर मोदी साहेबांचा आशीर्वाद आहे त्यांचा पराभव होणार नाही, दोन्ही उमेदवारांनी उत्तम काम केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्याच्या भेटी होईना; अडचणी कोणी विचारेना, कार्यकर्त्यांना भासतेय अजितदादांची कमी

धुळे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात! ट्रॅव्हल्स बस पलटी, 6 प्रवासी जखमी

कार चालवताना अचानक उघडली 'एअर बॅग', एअर बॅगमुळे 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

स्मार्ट मीटरचा झटका, ग्राहकांना लाखाचा फटका, सोलरधारकांना 20 पटीनं वीजबिल, महावितरणचं स्मार्ट मीटर की स्मार्ट लूट?

NEET नंतर TET चा पेपरही फुटला, 28 जूनची TET परिक्षा रद्द, भिवंडीतील पेपरफुटीचं हरियाणा-बिहार कनेक्शन

SCROLL FOR NEXT