Maratha Reservation Debate: Bombay High Court questions government on OBC vs 10% quota. saamtv
मुंबई/पुणे

Maratha Reservation: १० टक्के की OBC, मराठा समाजाला कोणतं आरक्षण देणार? उच्च न्यायालयाचा सरकारला सवाल

Maratha Reservation Row: मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला मराठा आरक्षण आणि ओबीसीबाबत भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले. मराठा समाजाला एसईबीसी अंतर्गत १०% वेगळे आरक्षण देणार की ओबीसीमधून याची स्पष्टता सरकारकडून करण्यात यावी असं न्यायालयाने सांगितलंय.

Bharat Jadhav

  • मराठा समाजाला कोणतं आरक्षण द्यायचं यावर उच्च न्यायालयाचा सरकारला सवाल.

  • एसीबीसी अंतर्गत १०% की ओबीसीमध्ये समावेश यावर चर्चा सुरू.

  • सुनावणी न्यायमूर्ती घुगे, जमादार आणि मारणे यांच्या खंडपीठासमोर झाली.

मराठा समाजाला एसीबीसी अंतर्गत १० टक्के की ओबीसीमधून आरक्षण, कोणतं आरक्षण द्याल. कोणतं आरक्षण कायम ठेवाल अशी विचारण मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला केलीय. एसीबीसी अंतर्गत मराठा समाजाला देण्यात आलेल्या दहा टक्के आरक्षणावरून मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीत न्यायालयानं सरकारला प्रश्न केलाय. याप्रकरणी पुढील सुनावणी ४ ऑक्टोबरला होणार आहे.

पूर्ण पिठासमोर आरक्षणाच्या समर्थनार्थ तसेच विरोधात दाखल झालेल्या याचिकांवर सुनावणी सुरू आहे. न्यायमूर्ती रवींद्र घुगे, न्यायमूर्ती एन जे जमादार आणि न्यायमूर्ती संदिप मारणे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. दरम्यान आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आणि ओबीसी समाजात वाद सुरू झालाय. मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र द्यावं, अशी मागणी करत मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन केलं होतं.

राज्य सरकारनं मराठा समाजाच्या मागण्या मान्य करत हैदराबाद गॅझेटियार लागू करण्यास हिरावा कंदील दाखवला. त्यात नोंद असलेल्या मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र दिलं जाणार असल्याचं सरकारने सांगितलं. आता मराठा समाजाकडे दोन आरक्षण झाली आहेत. त्यावरून न्यायालयाने सरकारला सवाल केलाय.

काही पात्र मराठा समाजाला कुणबी सर्टिफिकेट देणार असल्याचं मुख्यमंत्री यांनी सांगितल्याची माहिती वकील प्रदीप संचेती यांनी कोर्टाला उत्तर देताना दिली. संपूर्ण मराठा समाज मागास नाही, असा यु्क्तीवाद प्रदीप संचेती यांनी न्यायालयात केलाय. प्रदीप संचेती हे मराठा समाज मागास नाही हे पटवून देण्यासाठी वेगवेगळे दाखले देण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच जयश्री पाटील यांनीही मराठा मागासवर्गीय नाही हे डेटा दाखवून स्पष्ट केलं. शैक्षणिक मागासलेपण त्यांचे कुठेही स्पष्ट होत नसताना SEBC चे आरक्षण त्यांना देऊ केल्याचं वकील प्रदीप संचेती म्हणालेत. सुनावणी दरम्यान महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी राज्यसरकरातर्फे कोर्टात बाजू मांडली.

७० टक्के मराठा यांना शिक्षणासाठी फायदा आहे. ३० टक्के ओपन आहे हे तुम्ही वारंवार अधोरेखित करत असल्याचं न्यायाधीशांनी म्हटलंय. एकूण डेटा पाहता मराठा समाज कुठेच मागासवर्गीय असल्याचं दिसून येत नाही. तसेच दोन्हीकडे मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही, असं न्यायालयाने म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शरद पवार आजपासून ४ दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर

एकाशी लग्न, नंतर दुसऱ्यासोबत संसारासाठी निघून गेले; शिंदे गटाच्या खासदाराची सणसणीत टीका

लक्ष्मण हाकेंच्या लग्नाच्या वक्तव्यावरून मराठा समाज आक्रमक; जिथे दिसेल तिथे ठोकू, मनोज जरांगेंच्या सहकाऱ्याचा इशारा

Sunday Horoscope : कन्या राशीच्या संपत्तीत होणार वाढ तर मकर सोबत होणार विश्वासघात, पहा तुमच्या राशीत काय लिहिलेय!

Beed Crime: बीड पुन्हा हादरलं! लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण करून तरुणाचं अपहरण, घटनेचा व्हिडिओ व्हायरल|VIDEO

SCROLL FOR NEXT