Cm Eknath Shinde On Maratha Reservation Saam Tv
मुंबई/पुणे

Maratha Reservation: 'नेमलेल्या समितीला जरांगेंनी वेळ द्यावा', मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काय म्हणाले मुख्यमंत्री?

Satish Kengar

Cm Eknath Shinde On Maratha Reservation:

''सरकार आपल्या सोबत आहे, आपल्या जीवाची आम्हाला काळजी आहे. आरक्षणासाठी कमिटी गाठीतं केली आहे. नेमलेल्या समितीला जरांगेंनी वेळ द्यावा', असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात सह्याद्री अतिथी गृहात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली. यानंतर आता पत्रकार परिषद बोलत ते असं म्हणाले आहेत.

ते म्हणाले की, ''मराठा आरक्षण आणि मराठवाड्यातील कुणबी दाखला देण्यात बाबत मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरु आहे. याचे पडसाद राज्यभरात उमटताना पाहत आहोत. आज सर्वपक्षीय बैठक पार पडली. जरांगे यांच्या आरोग्याची चिंता सरकार आणि सर्व पक्षीय नेत्यांना आहे. जाती जातीत तेढ निर्माण होऊ नये. महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे. असे प्रसंग आले त्या-त्या वेळेस सरकार आणि सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठका झाल्या.''

मुख्यमंत्री म्हणाले की, ''यासाठी आम्ही आज सर्वांना बोलावले, सर्वांनी एक ठराव पास केला. जारांगे पाटील यांच्या तब्येतीच्या दृष्टीने सरकार काम करत आहे. तोपर्यंत उपोषण मागे घेण्याचा ठराव पास केला.''  (Latest Marathi News)

मराठा आंदोलकांवरील सर्व गन्हे मागे

मुख्यमनातरी शिंदे म्हणाले की, मराठा आंदोलकांवर जे गुन्हे दाखल झाले होते, ते गुन्हे मागे घेण्याची विनंती गावकरी आणि जरांगे पाटील यांनी केली होतो. त्यानुसार आंदोलकांवरील सर्व गन्हे मागे घेण्यात आले आहेत.

समितीत जरांगे पाटील यांचा प्रतिनिधी

न्यायमूर्ती श्री शिंदे समितीमध्ये मनोज जरांगे पाटील किंवा त्यांच्या प्रतिनिधीची नियुक्ती करण्यात येईल असेही यावेळी ठरले. सर्व पक्षाच्या नेत्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्य शासन करीत असलेल्या प्रयत्नांना पाठींबा दिला, त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले.

मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री सर्वश्री राधाकृष्ण विखे पाटील, छगन भुजबळ, गिरीश महाजन, दादा भुसे, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, विविध पक्षांचे निमंत्रित सर्वश्री छत्रपती संभाजीराजे भोसले, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, अनिल परब, राजेश टोपे, चंद्रशेखर बावनकुळे, राजू पाटील, विनोद निकोले, सदाभाऊ खोत, राजेंद्र गवई, सुनील तटकरे, गौतम सोनवणे, मुख्य सचिव मनोज सौनिक, तसेच विविध विभागांचे सचिव, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आदी उपस्थित होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bus Accident : घाट रस्त्यात बसचा अपघात; विद्यार्थ्यांसह ४० प्रवाशी जखमी

Maharashtra Politics: पुणे, सोलापूर ते लातूर, संगमनेर; काँग्रेसची उमेदवारी यादी रवींद्र धंगेकरांनी टाकली अन् डिलीट केली

Maharashtra News Live Updates: पपई पिकावर मोझॅक रोगाच्या प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

Poha Chivda: दिवाळीसाठी घरी खमंग अन् कुरकुरीत बनवा पोह्यांचा चिवडा

Mithila Palkar: वेब क्विन करतेय इटलीत भटकंती; पाहा फोटो

SCROLL FOR NEXT