Maratha Reservation Protest in Pune Navale Bridge Police filed a case against 400 to 500 people Saam TV
मुंबई/पुणे

Pune News: मराठा आरक्षणासाठी नवले पुलावर जाळपोळ; पोलिसांकडून ४०० ते ५०० जणांविरोधात गुन्हे दाखल

Maratha Reservation Protest: हिंसक आंदोलन आणि जाळपोळप्रकरणी सिंहगड पोलिसांनी ४०० ते ५०० जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

Satish Daud

Pune Navale Bridge Maratha Reservation Protest

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुण्यातील नवले पुलावर मंगळवारी टायर जाळून आंदोलन करण्यात आलं. त्यामुळे रस्त्याच्या बाजूला वाहनांच्या मोठ्या प्रमाणावर रांगा लागल्या होत्या. दरम्यान, हिंसक आंदोलन आणि जाळपोळप्रकरणी सिंहगड पोलिसांनी ४०० ते ५०० जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करून गर्दी जमा केल्याप्रकरणी पोलिसांनी ३३६ आणि कलम ४४१ अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा अंतरवाली सराटी गावात उपोषणाला बसले आहेत. मराठा बांधवांनी शांततेत साखळी उपोषण करावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

जरांगे यांच्या आवाहनानंतर राज्यातील अनेक जिल्ह्यात मराठा बांधवांचं साखळी उपोषण सुरू आहे. मात्र, काही ठिकाणी या आंदोलनाला गालबोट लागलं आहे. पुण्यातील नवले पुलावर मंगळवारी मराठा संघटनांनी आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी केली.

त्यातच काही जणांनी पुलावर टायर जाळून सरकारचा निषेध केला. रस्त्याच्या मधोमध टायर जाळल्याने नवले पुलाजवळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होते. त्यामुळे महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या प्रमाणावर रांगा लागल्या होत्या.

याचा नाहक त्रास अनेक नागरिकांना सहन करावा लागला.पोलिसांनी या ठिकाणी आंदोलकांची समजूत काढून तब्बल दोन ते अडीच तासांनतर वाहतूक सुरु करण्यात यश मिळवलं. मात्र, काही आंदोलकांनी जाळपोळ केल्याप्रकरणी आता सिंहगड पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : अलका टॉकीज चौकात "श्रीमंत" दाखल

Ganesh visarjan 2025 : गणपतीचे विसर्जन करताना विपरीत घडलं, तीन तरुण पाण्यात वाहून गेले

Pune News: पुण्यात दगडूशेठ गणपतीची महाआरती पाहा VIDEO

ITR Filing : टॅक्स रिफंड परताव्याचा फॉर्म अडकून पडलाय? मग 'या' गोष्टी एकदा तपासाच

Akola Accident: गणेश विसर्जन करून परताना भक्तांवर काळाचा घाला; तरुणाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT