Manoj Jarange Maratha Reservation Latest Update Saam Tv
मुंबई/पुणे

Breaking News: मनोज जरांगेंची तब्येत खालावली; मुख्यमंत्री शिंदेंची थोड्याच वेळात पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?

Maratha Reservation News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या पत्रकारपरिषदेत ते नेमकं काय बोलणार? याकडे संपूर्ण मराठा समाजाचं लक्ष लागून आहे.

Satish Daud

Maratha Reservation Latest Update

मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच तातडीनं अधिवेशन घेऊन त्यात कायदा पारित करावा अशी मागणी करत मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील अंतरवाली सराटी गावात आमरण उपोषण सुरू केलं आहे. १० फेब्रुवारीपासून जरांगे उपोषणाला बसलेले असून त्यांनी अन्न पाण्याचा त्याग केला आहे. आज त्यांच्या उपोषणाचा सातवा दिवस आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सलग ७ दिवस उपोषण सुरू असल्याने मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत चालली आहे. त्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला असून सरकारविरोधात रोष व्यक्त करीत आहेत. हीच बाब लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शुक्रवारी सकाळी ९ वाजता जाहीर पत्रकारपरिषद घेणार आहेत.

या पत्रकारपरिषदेत ते नेमकं काय बोलणार? याकडे संपूर्ण मराठा समाजाचं लक्ष लागून आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सगेसोयरे अध्यादेशाचा कायदा बनवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच अधिवेशन बोलावण्याची घोषणा करू शकतात. सध्या सरकारने अधिवेशनाची तारीख २२ फेब्रुवारी ठरवली आहे. (Latest Crime News)

मात्र, मनोज जरांगेंचं आंदोलन आणि मराठा समाजाचा रोष पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे २२ फेब्रुवारीच्या आधीच विशेष अधिवेशन बोलावण्याची घोषणा करू शकतात. यासोबतच मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाबाबत नेमका काय अहवाल दिला, याबाबतची माहिती पत्रकारपरिषदेत देऊ शकतात.

दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी सातव्या दिवशी आपलं उपोषण सुरू ठेवलं असलं, तरी कोर्टाच्या आदेशानंतर उपचार घेण्यास सुरूवात केली आहे. विशेष बाब म्हणजे गुरुवारी सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली होती. त्यानंतर आज दुपारी १ वाजता जरांगे जाहीर पत्रकारपरिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pav Bhaji: घरच्या घरी स्ट्रीट स्टाईल पावभाजी कशी बनवायची?

Maharashtra News Live Updates: रत्नागिरीत अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या

Madhuri Dixit: धकधक गर्लचं लाजवाब सौंदर्य, फोटो पाहताच घायाळ व्हाल

Sonu Nigam : 'ये दिल दीवाना...' रस्त्यावर थांबून छोट्या चाहत्यासोबत सोनू निगमनं गायलं गाणं, पाहा VIDEO

आता देशात एकसमान मानकांद्वारे घेण्यात येणार मातांची काळजी, NABH कडून नवीन आरोग्य मानकांचा समावेश

SCROLL FOR NEXT