Maratha Protest Azad Maidan x
मुंबई/पुणे

Maratha Protest : आझाद मैदानात गळफास घेण्याचा प्रयत्न, मराठा आंदोलकांनी रोखलं अन् अनर्थ टळला

Maratha Protest Azad Maidan : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मनोज जरांगे पाटलांसह मराठा समाज आझाद मैदानावर जमला. या आंदोलनादरम्यान एकाने आझाद मैदानात गळफास घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

Yash Shirke

  • मराठा आंदोलनादरम्यान आझाद मैदानात एका व्यक्तीने गळफास घेण्याचा प्रयत्न केला.

  • पण उपस्थित मराठा आंदोलकांनी वेळेत रोखत या व्यक्तीचा जीव वाचवला.

  • एका दिवसाची मुदतवाढ मिळाल्याने आझाद मैदानावर मराठा बांधवांनी मुक्काम केला आहे.

Azad Maidan Mumbai : मराठा आंदोलनाच्या मुद्द्यावरुन मनोज जरांगे पाटील हे आक्रमक झाले आहेत. मराठा समाजाच्या हजारो आंदोलनकर्त्यांसह त्यांनी मुंबई गाठली. मुंबईतील आझाद मैदानावर जरांगे यांनी उपोषण देखील केले. कोर्टाने उपोषणासाठी, आंदोलनासाठी दिलेली मुदत संपल्यानंतर मनोज जरांगे आणि मराठा समाजाला एका दिवसाची मुदतवाढ देण्यात आली. मुदतवाढीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेनंतर आझाद मैदानात एक धक्कादायक घटना घडली.

आझाद मैदानात हजारोंच्या संख्येने मराठा बांधव जमले आहेत. या आंदोलनादरम्यान एका व्यक्तीने आझाद मैदानात गळफास घेत स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला. आजूबाजूला असलेल्या मराठा मोर्चातील आंदोलकांनी या व्यक्तीला वाचवले. गळफास घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव शिवाजी तुकाराम कुमरे (वय ७७ वर्ष) असे आहे.

आत्मदहनाचा प्रयत्न

मनोज जरांगे पाटील यांच्यासह असंख्य मराठा बांधव आज (२९ ऑगस्ट) मुंबईत पोहोचले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मंत्रालय परिसरात मराठा बांधवांनी मोठी गर्दी केली. यादरम्यान एका मराठा तरुणाने अंगावर डिझेल ओतून घेत स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. आसपासच्या लोकांनी आणि पोलिसांनी या तरुणाला रोखले. आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती.

कार दुर्घटना

काल (२८ ऑगस्ट) मुंबईमध्ये वाशी टोलनाक्यावर मोठ्या संख्येने मराठा समाज एकत्र आला होता. यादरम्यान मराठा बांधवांनी मोठा जल्लोष केला. यादरम्यान काही कार्यकर्त्यांच्या कारला अपघात झाला. या अपघातामध्ये लातूरच्या शिरूर अनंतपाळ तालुक्यातील तिघेजण जखमी झाले. यातील एका प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manikrao kokate : 'आमदार अमोल मिटकरी' माझे 'गुरु'...त्यांच्यामुळे जिंकलो; मंत्री माणिकराव कोकाटे यांचं विधान चर्चेत

Budh Gochar 2025: ऑक्टोबर महिन्यात बुधाच्या गोचरमुळे 3 राशींच्या आयुष्यात येणार आनंद; 'या' राशींना गुंतवणूकीतून मिळणार लाभ

Ardhakendra Yog 2025: 25 सप्टेंबरपासून चमकणार 'या' राशींचं नशीब; धनदाता शुक्र बनवणार खास योग

India vs Pakistan : नाद करा, पण आमचा कुठं! भारताचा पाकिस्तानवर एकतर्फी विजय; अभिषेक- गिलने धू धू धुतलं

Laxman Hake: आरक्षणाचा वाद वाढणार; SC मधून 'या' समाजालाही आरक्षण द्या; लक्ष्मण हाकेंची नवी मागणी

SCROLL FOR NEXT