रश्मी पुराणिक
मुंबई - राजकारणात फोडाफोडी होतेच; त्याला जशास तसे उत्तर द्यायचे असते असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षातील काही नेते, कार्यकर्ते काँग्रेसमध्ये (Congress) येणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मध्यंतरी सांगितले होते. त्यापार्श्वभूमीवर कॉंग्रेसला ताजे करण्यासाठी काही महत्वाच्या पदाधिकार्यांचा पक्ष प्रवेश घेवून काँग्रेस पक्ष कामाला लागल्याचे दिसत आहे. भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेनेला खिंडार पडून लवकरच महत्वाच्या पदावर असलेल्या स्थानिक नेत्यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे. (Nana Patole Latest News In Marathi)
हे देखील पहा -
नाना पटोले पुढे म्हणाले की, मुंबईतील टिळक भवन येथे विविध पक्षातील महत्वाचे पदाधिकारी, अनेक विद्यमान तालुका अध्यक्ष, शहराध्यक्ष, नगराध्यक्ष, तब्बल २० हून अधिक विद्यमान नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगर परिषद सदस्यांचा कॉंग्रेसमध्ये भव्य प्रवेश समारोह आयोजित करण्यात आला आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रवेशामागे खरा चेहरा कॉंग्रेसचे सचिव सुरेश कुंडलिकराव नागरे यांचा असल्याचे देखील स्पष्ट झाले आहे.
राज्यात स्वबळावर निवडणुकांच्या तयारी चालविलेल्या आणि त्यासाठी मुंबईत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक सुरू असतानाच मालेगावमधील काँग्रेसच्या माजी आमदार, महापौरांसह नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याचे पडसाद महाविकास आघाडीवर विशेषत: दोन्ही काँग्रेसच्या राजकारणावर उमटत आहेत असे देखील ते यावेळी म्हणाले.
"ज्यांनी स्वत: पक्ष सोडला; त्यांनी नाराजी मांडण्याचे कारण नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमधूनही काहीजण काँग्रेसमध्ये येणार आहेत. ज्यांनी आमचे नगरसेवक फोडले, त्यांचेही भविष्यात काय करायचे ते नक्कीच ठरवू महाविकास आघाडी असली, तरीही राजकारण सुरूच असते. अशा राजकारणाला त्याच भाषेत उत्तर द्यायचे असते तशी तयारी काँग्रेसची आहे. काँग्रेस पक्ष गप्प बसणारा नाही." असे पटोले म्हणाले होते.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.