मुंबईत मराठा आरक्षणासाठी आंदोलकांचा ठिय्या आंदोलन, BMC समोर गोंधळ.
पोलिसांशी आंदोलकांची बाचाबाची, वाहतूक कोंडीमुळे CSMT परिसर ठप्प.
आंदोलकांकडून मुंडन आंदोलन, रस्त्यावर अंघोळ करून निषेध.
मंत्रालयाबाहेर RCP आणि दंगल नियंत्रण पथक तैनात, मार्ग बंदोबस्त कडक.
Manoj Jarange Mumbai Maratha Morcha Live Update : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. मराठा आरक्षणासाठी मराठे मुंबईत धडकले आहेत. सकाळीच मराठा आंदोलकांनी बीएमसीसमोर ठिय्या आंदोलन केले, त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. मराठा समजाची समजूत काढण्यासाठी पोलिसांनी धाव घेतली. त्यावेळी मराठा आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. BMC समोर मोठा गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले. आंदोलकांनी रस्त्यावरच ठिय्या करत आरक्षणाची मागणी केली.
पोलिसांकडून मराठा समजाची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण मराठा समाज आंदोलनावर ठाम राहिला. त्यामुळे सीएसएमटी आणि बीएमसीबाहेर एकच गोंधळ उडाला. मुंबईतील हा चौक रिकमा करण्यासाठी पोलिसांकडून विनंती करण्यात आली. पण आंदोलकांनी काही ऐकलं नाही. जोपर्यंत सरकार मराठा आरक्षणाबाबत सरकार जोपर्यंत भूमिका स्पष्ट करत नाही, तोपर्यंत रस्ता रिकमा केला जाणार नाही, असे मराठा समाजाकडून स्पष्ट करण्यात आले. मागील दोन ते तीन तासांपासून वाहतूक ठप्प झाली आहे. बीएमसी, सीएसएमटी स्थानकाबाहेर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. आंदोलकांकडून बीएमसीबाहेर मुंडन आंदोलन करण्यात आले आहे. जोपर्यंत आरक्षण देणार नाही, तोपर्यंत येथून हलणार नाही, असे मराठा समाजाकडून सांगण्यात आलेय.
मराठा समाजाच्या आंदोलनामुळे सीएसएमटी परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. काही आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या देत रस्ता अडवला आहे. काहींनी मुंडन आंदोलन केलेय. तर काहींनी रस्त्यावर अंघोळ करून निषेध नोंदवला जातोय. पोलिसांनी त्यांना विनंती केली मात्र त्यांनी आमची सोय करावी त्यानंतर आम्ही येथून जाणार असल्याचं म्हटलं आहे.
सीएसएमटी परिसरातील खाण्याची सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे आंदोलकांचे खाण्याचे हाल होत आहेत. सरकारकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने आंदोलक आक्रमक झाले आहेत. पाणी प्यायला नाही, हॉटेल बंद केलेत, मोबाईलचे चार्जरचे पॉइंटही बंद आहेत, यााचा सरकारला काहीच फरक पडत नाही. आम्ही दारू प्यावी यासाठी वाईन शॉप सुरू ठेवली आहेत का? असा सवाल संतप्त आंदोलकांकडून विचारण्यात येतोय.
मुंबईच्या मंत्रालयाबाहेर पोलिसांचा चोक बंदोबस्त तैणात करण्यात आला आहे. RCP मुंबई पोलीस तसेच दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहेत. मंत्रालयकडे जाणाऱ्या संपूर्ण मार्गावर पोलिसांनी बॅरिकेट लावून मार्ग बंद केला आहे.
प्रत्येक जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांची विचारपूस करूनच पोलीस आतमध्ये सोडत आहेत. तर मंत्रालयाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.