Manoj Jarange Patil Maratha Reservation News  Saam TV
मुंबई/पुणे

Manoj Jarange Patil: मराठ्यांचं वादळ आझाद मैदानावर धडकणारच; मनोज जरांगेंनी स्पष्ट केली भूमिका

Manoj Jarange Patil News: मनोज जरांगे यांनी नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये झेंडावंदन केले. यानंतर त्यांनी पत्रकारपरिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Satish Daud

Manoj Jarange Patil Maratha Reservation News

तब्बल ६ दिवसांच्या पायी यात्रेनंतर अखेर मनोज जरांगे पाटील हजारो मराठा आंदोलकांसह मुंबईच्या वेशीवर येऊन धडकले आहेत. जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये मोठ्या संख्येने मराठा बांधव जमले आहेत. सकाळी ९ वाजेच्या सुमारास जरांगे यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेनंतर असून सकाळी ११ वाजेनंतर ते आझाद मैदानाच्या दिशेने कूच करणार आहे. (Latest Marathi News)

दरम्यान,  मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी एपीएमसी मार्केटमध्ये झेंडावंदन केले. यानंतर त्यांनी पत्रकारपरिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा अद्याप झालेली नाही. थोड्या वेळात चर्चा होईल. बैठकीत तोडगा निघाला नाही तर आझाद मैदानावर जाणार आहे, असे मनोज जरांगे यांनी सांगितलं.

मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी पोलिसांनी नाकारली आहे. तसेच शिवाजी पार्कची परवानगी नाकारली आहे. आझाद मैदानाची क्षमता लक्षात घेऊन त्यांना परवानगी दिली नाही. परंतु मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी ठाम आहे. (Latest Marathi News)

पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानाऐवजी खालघरच्या सेंट्रल पार्कचा प्रस्ताव दिला आहे. मात्र, जरांगे यांनी हा प्रस्ताव धुडकावून लावला आहे. आम्ही आझाद मैदानावरच उपोषण करणार, असं जरांगे यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, आझाद मैदानाकडे कूच करण्याआधी सरकारचं शिष्टमंडळ जरांगे यांची भेट घेणार आहे. राज्य सरकारकडून मनोज जरांगे पाटील यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहे. दुसरीकडे सरसकट कुणबी प्रमाणपत्राचा निर्णय जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत माघार घेणार नाही, असं जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Mushroom Masala: अवघ्या काही मिनिटात तयार करा झणझणीत आणि चवदार मशरूम मसाला

ड्रम निळ्या रंगाचाच का असतो?

Lip Care: हायड्रेशनच्या कमीमुळे ओठ काळे पडले आहे का? मग करा 'हे' घरगुती उपाय

Raju Shetti : पंढरपुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी दिंडी; राजू शेट्टी यांचे आंदोलन, पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT