ManoJ Jarange Patil Saam tv
मुंबई/पुणे

ManoJ Jarange Patil : आंदोलनाचा शेवट मला गोळ्या घालून होईल; मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा, VIDEO

ManoJ Jarange Patil on Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांनी महायुती सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. आंदोलनाचा शेवट मला गोळ्या घालून होईल असल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

Vishal Gangurde

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानात ठाण मांडलं आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची मुदत दिवसेंदिवस वाढू लागली आहे. जरांगे यांनी मराठा आरक्षणावरून केंद्रीय गृहमंत्री, महायुती सरकार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. माझ्या आंदोलनाचा शेवट मला गोळ्या घालून होईल, अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करत खळबळजनक दावा केला.

मनोज जरांगे पाटील यांनी साम टीव्हीशी संवाद साधला. यावेळी जरांगे पाटील यांनी महायुती सरकारवर गंभीर आरोप केले. जरांगे म्हणाले, ' माझे मराठे शांत आहेत. मुंबई शांत आहे. वेगळ्या वळणावर गेले नाही. आमच्या एका मुलाचा मृत्यू झाला. त्याला हार्ट अटॅक आला. शिवनेरीलाही आमच्या लेकराचा मृत्यू झाला. पण तो खून आहे, फडणवीस यांनी केला. सगळं होईल. मी आणखी संयमी आहे. मराठे संयमी आहेत'.

शिंदे समितीच्या भेटीवर जरांगे म्हणाले, 'समाधान झालेले नाही. चर्चा झाली आहे. वेळ मिळणार नाही हे मी त्यांना सांगितलं आहे'. कुणबी दाखल्याबाबत जरांगे पाटील म्हणाले, '१३ महिने अभ्यास केला आहे. आता कशाला वेळ हवा आहे. हैदराबाद, सातारा तातडीने हवं आहे. मराठवाड्यातला मराठा सगळा कुणबी आहे. पश्चिम महाराष्ट्रातही तेच आहे'.

आंदोलनात सामील झालेल्या मराठा तरुणांच्या मृत्यूवर जरांगे पाटील म्हणाले, 'सोईसुविधा केल्या असत्या तर असं घडलं नसतं. आता कुणाच्या तरी आईचं लेकरू गेलं ना. त्याची आई शापशिव्या देईल. हातात परवानगी असूनही देत नाही. मला गोळ्या घातल्या तरी मी येथून जात नाही. मला गोळ्या घाला. सत्ता आहे तर करा'.

'मराठ्यांना पुढच्या शनिवार-रविवारपर्यंत शांत राहा. मैदानात गाड्या लावा. आझाद मैदानात शांत बसा. आरक्षण घेऊनच जाऊ. नाही तर पुढच्या आठवड्यात कळेल की, महाराष्ट्र झाडून मुंबईत येणार आहे, असं जरांगेंनी ठाम सांगितलं.

'परवानगी मुद्दाम देत नाहीत. बुद्धी, नासकेपणाने सरकार चालवतेय. भाजपचे आमदार, मंत्री आणि या दोन्ही पक्षांतील नेतेही नाराज आहेत. सगळा हिशेब होणार, शांततेत होणार. आंदोलनाचा शेवट आरक्षण घेऊन होणार नाही तर याचा शेवट देवेंद्र फडणवीस मला गोळ्या घालून करणार. त्या दिवशी मराठे आणि तुम्ही जाणून घ्या, असा खळबळजनक आरोप जरांगेंनी केला.

'मला गोळ्या घालून मारायचं किंवा जेलमध्ये टाकायचा आहे. मला काही भीती वाटत नाही. नाहीतर इकडे आलो नसतो. असेही जरांगे म्हणाले. 'आमच्याशी इथे जसं मुंबईत वागाल, तर महाराष्ट्राबाहेर त्यांच्या नेत्यांशी आमचे लोक वागतील. मराठ्यांनी शांत राहायचं, संयम ठेवायचा. गाड्या लावायच्या आणि मुंबईत यायचे. शिवीगाळ, दगडफेक, जाळपोळ असलं काही करायचं नाही, असंही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: आयुष्यात 'या' लोकांशी शत्रुत्व महागात पडेल, कारण...

Priya Marathe: लाडक्या मैत्रीणीला शेवटाचा निरोप; अभिनेत्री प्रार्थना बेहेरेला अश्रू अनावर, हृदय पिळवटून टाकणारा क्षण, VIDEO

Padwal Curry Recipe : गावाकडे बनवतात तशी झणझणीत पडवळ करी, वाचा पारंपरिक रेसिपी

Pandharpur Temple: विठ्ठल मंदिरातील लाडू प्रसादाला बुरशी; पाकिटातून निघाल्या आळ्या

पोलीस इन्स्पेक्टरचा टोकाचा निर्णय; राहत्या खोलीत आयुष्य संपवलं; कुटुंबियांना वेगळाच संशय

SCROLL FOR NEXT