Manoj Jarange Mumbai March  Saam Tv
मुंबई/पुणे

Maratha Reservation: आज रात्रीच मराठा समाजाला मिळणार गोड बातमी? सरकारने घेतला मोठा निर्णय

Manoj Jarange Patil Mumbai March: मराठा आरक्षणासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकार सगेसोयरे यांच्या नोंदी करण्यासंदर्भातला अद्यादेश आजच काढू शकते.

सुरज सावंत

Maharashtra Government:

मराठा आरक्षणासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. आज सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी कुणबी दाखले असणाऱ्यांच्या सग्यासोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, अशी मागणी केली असल्याचं जरांगे यांनी सांगितलं होतं. ते म्हणाले होते की, सरकारने याबाबत आजच अध्यादेश द्यावा, तोपर्यंत मुंबईतून जाणार नाही. यातच आता राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकार सगेसोयरे यांच्या नोंदी करण्यासंदर्भातला अद्यादेश आजच काढू शकते. या अद्यादेशाचा मसूदा तयार करण्यात आला असून त्याची प्रत थोड्याच वेळात जरांगे याना सुपूद्र केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, आज साम टीव्हीशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत की, ''५४ लाख नोदींबाबतची मागणी केलेली त्यावर ३९ लाख नोंदींचे प्रमाणपत्र वाटप केल्याचे सरकारने सांगितले आहे. तसेच ज्यांच्या नोंदी मिळाल्या आहेत, त्यांच्या परिवारालाही प्रमाणपत्र दिलं जाईल, त्यासाठी अर्ज करावा लागेल.'' (Latest Marathi News)

ते म्हणाले, ''ज्यांच्या नोंदी मिळाल्या आहेत त्या ग्रामपंचायतीत लावण्याच्या सुचना केल्या होत्या, त्यासाठी सरकारने अर्ज नोंदणीचे एक विशेष शिबीरच सुरू केले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच एकाची नोंद मिळाल्यास त्याच्या प्रमाणपत्रावर त्याच्या सगेसोयऱ्यांनाही ओबीसी प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी केली होती, त्याचा अध्यादेश सरकारने काढला नाही.''

जरांगे पुढे म्हणाले, ''आंदोलन करुन कोणालाही वेठीस धरायचे नाही. सरकारने उद्यापर्यंत अध्यादेश द्यावा. अध्यादेश हातात येईपर्यंत आंदोलन यशस्वी झालं म्हणणार नाही. आता दगाफटका झाल्यास सगळा महाराष्ट्र मुंबईत बोलावणार, आत्ता फक्त २ कोटीच आलेत मात्र नंतर पुर्ण समाज येईल.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Government Job: १०वी, १२ वी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी! भारत डायनामिक्स लिमिटेडमध्ये १५० पदांसाठी भरती, अर्ज कसा करावा?

Maharashtra News Live Updates: रत्नागिरीत अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या

Suraj Chavan: 'मला वेड लावलयं...'म्हणतं रितेश भाऊंच्या गाण्यावर गुलीगत सूरजनं धरला ठेका, Video पाहा

Candidate List Party wise : निवडणूकीच्या रिंगणात किती पक्षांचे उमेदवार, शिवसेना-ठाकरे कोणत्या क्रमांकावर? अशी आहे संपूर्ण यादी

TMKOC Fame Jheel Mehta: कोण आहे भिडेंचा जावई? 'तारक मेहता' फेम सोनू लवकरच अडकणार लग्नबंधनात; तारीखही ठरली

SCROLL FOR NEXT