Manoj Jarange SIT probe Saam TV
मुंबई/पुणे

Maratha Andolan: मनोज जरांगेंच्या आंदोलनाची SIT चौकशी होणार; भाजप आमदारांच्या मागणीनंतर फडणवीसांची मोठी घोषणा

Manoj Jarange SIT probe: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे पाय खोलात गेले आहेत. कारण, देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याची घोषणा केली आहे.

Satish Daud

Manoj Jarange Patil Latest News

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करणारे मनोज जरांगे पाटील यांचे अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. कारण, भाजप आमदारांनी जरांगे यांच्याविरोधात विधानसभेत आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला आर्थिक मदत कुणी केली? असा सवाल उपस्थित करत या प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हावी, अशी मागणी भाजप आमदार आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर यांनी केली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी मान्य केली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी होणार, अशी घोषणा फडणवीसांनी विधानसभेत केली आहे. तसेच यामागचे सूत्रधार आम्ही शोधून काढू, असंही फडणवीसांनी सांगिलतं आहे. त्यामुळे जरांगे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

मराठा आंदोलनावरून विधानसभेत काय घडलं?

आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भाजपा नेते आशिष शेलार यांनी हा विषय सभागृहात मराठा आंदोलकांनी केलेल्या हिंसक आंदोलनाचा प्रश्न उपस्थित केला. यावरून सभागृहात प्रचंड खडाजंगी झाली. महाराष्ट्रात काहीतरी भयंकर घडण्यासाठी कट रचला जातोय, अशी परिस्थिती आहे. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असं शेलार म्हणाले.

महाराष्ट्र बेचिराख करण्याच्या भूमिकेविरोधात या सदनात नाही बोलणार तर कुठे बोलणार? असा प्रश्न आशिष शेलारांनी उपस्थित केला. महाराष्ट्रात पंतप्रधानांची सभा उधळून टाकू, असं म्हटलं जातंय. हा कटकारस्थानाचा भाग आहे. या विषयाची गंभीर नोंद घेतली पाहिजे, असंही आशिष शेलार म्हणाले.

"ज्या पद्धतीची भाषा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांविरोधात वापरली. यामध्ये तुला निपटून टाकू, अशी भाषा जरांगेंनी वापली. तसेच तुम्हाला शेवटची संधी देतो असं ते म्हणाले हे काय चाललं आहे? असा सवाल करत जरांगेंच्या मागून कोण बोलतंय याची एसआयटी चौकशी झाली पाहिजे", अशी मागणी यावेळी शेलार यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

SCROLL FOR NEXT