Father burns daughter's face in Mankhurd saam tv news
मुंबई/पुणे

Mankhurd: झोपत नाही म्हणून बाप संतापला; लेकीच्या चेहऱ्यावर दिले सिगारेटचे चटके, नराधमाने अत्याचाराची मर्यांदा ओलांडली

Mankhurd Tragedy: मानखुर्दमध्ये वडिलांकडून पाच वर्षांच्या मुलीवर सिगारेटचे चटके दिल्याची संतापजनक घटना उघडकीस आली. शेजाऱ्याने व्हिडिओ काढून पोलिसांना दिला, आरोपीला अटक करण्यात आली.

Bhagyashree Kamble

बाप लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना मानखुर्दमधून समोर येत आहे. झोपत नाही म्हणून निर्दयी पित्याने लेकीच्या चेहऱ्यावर सिगारेटचे चटके दिले आहेत. तसेच संतापून गळा आवळण्याचा प्रयत्न केला. मुलगी रडत असल्याचं पाहून शेजारी राहणाऱ्या तरूणीने धाव घेतली. तसेच व्हिडिओ शूट करून नराधम पित्याच्या तावडीतून सोडवलं. त्यानंतर पोलिसंना व्हिडिओ दाखवला. या प्रकरणानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

ही संतापजनक घटना मानखूर्दमध्ये घडली. घटनेच्या दिवशी बाप आणि मुलगी घरी होते. झोपत नाही म्हणून निर्दयी पित्याने स्वत:च्या प अवघ्या पाच वर्षांच्या चिमुकलीच्या चेहऱ्यावर सिगारेटचे चटके दिले. तसेच मारहाण करत तिचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. मुलीचा जोरजोरात रडण्याचा आवाज ऐकताच तिने शेजारच्या घरात धाव घेतली.

पित्याचे कृत्य पाहून तिने आधी व्हिडिओ शूट केला. नंतर चिमुकलीला त्याच्या तावडीतून सोडवलं. तसेच थेट पोलीस ठाणे गाठत पोलिसांना याची माहिती दिली. यासह व्हिडिओही दाखवला. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून, त्यांनी चिमुकलीला पुढील उपचारासाठी रूग्णालयात दाखल केलं. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

जुन्या वादातून जबर हाणामारीची घटना पुण्यातून उघडकीस झाली आहे. काल रात्री कात्रज परिसरात दोन गटात तुफान हाणामारी झाली. जुन्या वादातून हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे. अल्पवयीन मुले टू व्हीलरवरून जात असताना, दुसऱ्या बाजूने आलेल्या मुलांनी त्यांना अडवून जबर मारहाण केली. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, भारती विद्यापीठ पोलिसांनी अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतलं. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EVM Recounting: 8 महिन्यानंतर खडकवासल्यात फेरमतमोजणी, VVPAT मधील व्होटर स्लिप गहाळ ?

Crime News: मुंबईच्या २४ वर्षीय महिलेवर दुबईत सामूहिक बलात्कार; ५ सहकाऱ्यांच्या वासनेची बळी पडली

Maharashtra Politics: फडणवीस करणार मंत्रिमंडळाची साफसफाई, मंत्रिमंडळात फेरबदल, 8 विकेट पडणार?

Maharashtra Politics: यापुढे माझ्या अध्यक्षतेखाली बैठका घ्या! राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यावर शिरसाट संतापले

पालकांनो मुलांना सांभाळा,12 व्या मजल्यावरून पडून चिमुकलीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT