APMC Market Saam TV
मुंबई/पुणे

APMC Market: रसाळ आंबा एपीएमसी बाजारात दाखल; किंमत पाहिली का?

Mango In APMC Market: अजून एक महिन्यानंतर आंब्याचे उत्पादन आणखी वाढेल. त्यामुळे त्यावेळी सर्वसामान्य माणसं देखील रसाळ आणि फळांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंब्याची चव चाखू शकतील.

Ruchika Jadhav

Mango News:

फळांचा राजा आंबा संपूर्ण वर्षभरातून एकदाच खायला मिळतो. अशात आंबा प्रेमींसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. यावर्षीचा पहिला आंबा एपीएमसी फळ बाजारात दाखल झाला आहे. व्यापारी अमोल शिंदे यांच्या गाळ्यावर यावर्षीचा पहिला आंबा विक्रिसाठी उपलब्ध आहे.

रत्नागिरीतून हापूस आंब्याच्या २ पेट्या आणल्या गेल्यात. आंबा आल्याबरोबर त्याची विधिवत पूजा देखील करण्यात आली आहे. नुकतीच बाजारात आलेली आंब्याची ही पेटी सध्या 10 ते 15 हजर रुपयांना विकली जातेय. आंबे खवय्यांसाठी ही मोठी खुशखबर मानली जात आहे.

यंदा आंब्याचं मुबलक उत्पादन झालं असून लवकरच आंब्याची आवक वाढणार असल्याचं व्यापारी अमोल शिंदेंनी म्हटलंय. सध्या जरी आंबा फार महाग असला तरी भविष्यात सर्वांनाच मुबलक दरात उपलब्ध होऊ शकतो. अजून एक महिन्यानंतर आंब्याचे उत्पादन आणखी वाढेल. त्यामुळे त्यावेळी सर्वसामान्य माणसं देखील रसाळ आणि फळांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंब्याची चव चाखू शकतील.

एपीएमसीमध्ये दाखल झालेला आंबा रत्नागिरीवरून आलाय. गेल्या ६५ वर्षांपासून सुर्वे कुटुंबीय या आंब्याचं उत्पादन घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

SCROLL FOR NEXT