MPSC Exmam
MPSC Exmam Saam Tv
मुंबई/पुणे

MPSC परीक्षेदरम्यान गैरप्रकार उघड; ब्लूट्युथ, मोबाईल सापडला

साम टिव्ही ब्युरो

पुणे: शासकीय नोकऱ्यांसाठी होणाऱ्या परीक्षेमध्ये गैरप्रकार रोखण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे, आज एमपीएससीकडून (MPSC) घेण्यात येणाऱ्या परीक्षेदरम्यान पुण्यातील एका परीक्षा केंद्रावर गैरप्रकार निर्दशनास आला. पुणे जिल्हा केंद्रांवरील नऱ्हे येथील उपकेंद्रावर केवलसिंग चैनसिंग गुसींगे या उमेदवाराकडे गैरप्रकाराच्या उद्देशाने लपवलेले मोबाईल फोन व ब्लूटूथ इयर फोन इत्यादी साहित्य सापडले आहे. या विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या संदर्भात एमपीएसीने ट्विट करुन माहिती दिली आहे. या उमेदवारावर आयोगाच्या कार्यालयाकडून कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2021-संयुक्त पेपर 1 करीता आज रोजी आयोजित परीक्षेच्या विविध उपकेंद्रांच्या ठिकाणी आयोगाच्या दक्षता पथकाने संशयित उमेदवारांची तपासणी केली.त्यामध्ये पुणे जिल्हा केंद्रांवरील नऱ्हे येथील उपकेंद्रावर केवलसिंग चैनसिंग गुसींगे या उमेदवाराकडे गैरप्रकाराच्या उद्देशाने लपवलेले मोबाईल फोन व ब्लूटूथ इयर फोन इत्यादी साहित्य सापडले.

सदर उमेदवारावर आयोगाच्या कार्यालयाकडून कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे, असं ट्विट एमपीएससीने (MPSC) केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

International Workers Day: १ मेला 'कामगार दिन' का साजरा करतात? जाणून घ्या

Beed Lok Sabha: बीडमध्ये पंकजा मुंडेंना मोठा धक्का; महाविकास आघाडीची ताकद वाढली!

Shirur Loksabha: बारामतीनंतर शिरुरमध्येही अपक्षाच्या हाती 'तुतारी'; अमोल कोल्हेंची वाढणार चिंता?

OLA Layoffs : 'ओला'मधील 10 टक्के कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड; CEO बख्शींनी दिला ३ महिन्यात राजीनामा

Today's Marathi News Live : बुलढाणा जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई; जलाशयात फक्त 11. 62 टक्के पाणीसाठा.

SCROLL FOR NEXT