Today's Marathi News Live : ठाण्याच्या जागेचा मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो मान्य, प्रताप सरनाईक

Maharashtra Chya Tajya Marathi Batmya Live (30 April 2024): देश विदेश तसेच महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी वाचा फक्त एका क्लिकवर.
Marathi News Live By Saam Tv
Aajchya Marathi Batmya Live - 30 April 2024 | Latest Updates on IPL, Amit Shah, Lok Sabha Election, Amit Shah and overall MaharashtraSaam Tv
Published On

ठाण्याच्या जागेचा मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो मान्य, प्रताप सरनाईक

ठाण्याच्या जागेचा तिढा सुटलेला आहे

मुख्यमंत्री उद्या निर्णय देतील

मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे

प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया

दादरमध्ये कारमध्ये सापडली १.४ कोटीची रोकड

सध्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून अनधिकृत प्रकारांवर पोलिसांची करडी नजर आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलिसांना अनधिकृत रोकड आढळून आली आहे. आज पुन्हा दादरमध्ये एका कारमध्ये १.४ कोटीची रोकड आढळून आली आहे. पोलिसांनी ही रक्कम जप्त केली आहे.

महाराष्ट्रात पंतप्रधानांना पुन्हा पुन्हा यावं लागतंय,  याचा विचार करायला हवा; शरद पवार

देशाचं सूत्र देशाचा कारभार कोणाच्या हातात द्यायचं

ज्यांचा हातात सत्ता दिली त्याचा आढावा घेण्याची ही निवडणूक आहे

देशाचे पंतप्रधान महाराष्ट्रात होते चांगली गोष्ट आहे

महाराष्ट्रात पुन्हा पुन्हा याव लागतंय

स्थिती कशामुळे आली

यंत्रणेचा आकडा हा गमतीचा आहे

तामिळनाडूत एक दिवस,

महाराष्ट्रात ४८ जागा आहेत इथे तीन टप्प्यात कशासाठी

महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात आकर्षक रोषणाई

महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला राजधानी नवी दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात तिरंग्याची आकर्षक रोषणाई

तिरंग्याच्या आकर्षक रोषणाईने महाराष्ट्र सदन खुलंल

आकर्षक विद्युत रोषणाईची दिल्लीकरांना भुरळ

शिवसेनेचा वचननामा उद्या होणार प्रसिद्ध

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्या महत्त्वाच्या विषयावर पत्रकार परिषद होणार आहे. संध्याकाळी पाच वाजता बाळासाहेब भवन येथे ही पत्रकार परिषद होणार आहे. याचवेळी शिवसेनेचा वचननामा प्रसिद्ध केला जाणार आहे, असं सांगण्यात येत आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु उद्या अयोध्येत प्रभू श्रीराम चंद्राचं घेणार दर्शन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु उद्या अयोध्येला जाणार

अयोध्येत प्रभू श्रीराम चंद्राचं घेणार दर्शन

हनुमान गढी मंदिरात जाऊन देखील घेणार दर्शन

राम मंदिर सोहळा झाल्यानंतर राष्ट्रपती पहिल्यांदाच अयोध्येत जात आहेत

इंद्रायणी नदीच्या काठावर हातभट्टीवरील दारू विरोधात मोठी कारवाई

इंद्रायणी नदीच्या काठावर देशी हातभट्टी दारू तयार करणाऱ्या हातभट्टीवर पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. एमआयडीसी भोसरी पोलिसांनी जेसीबी मशीन च्या साह्याने इंद्रायणी नदी काठाजवळ जमिनीत फुरून ठेवलेले देशी हातभट्टी दारूच्या मोठया टाक्या नष्ट केल्या आहेत. राज्यांतील लाखो वारकऱ्यांच श्रद्धा स्थान असलेल्या इंद्रायनी नदी काठी काही व्यक्ती अवैध देशी हात भट्टी दारु तयार करतात अशी माहिती एम आय डी सी भोसरी पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत जवळपास 9000 लिटर देशी अवैध हातभट्टी दारू नष्ट केली आहे

नाशिकच्या जागेवरून महायुतीत वेगवान हालचाली

नाशिकच्या जागेवरून महायुतीत वेगवान हालचाली

गिरीश महाजन छगन भुजबळ यांना भेटण्यासाठी भुजबळ फॉर्मवर दाखल.

सकाळी दिंडोरी लोकसभा उमेदवार भरती ताई पवार यांनी घेतली होती भुबळांची भेट.

नाशिकच्या जागेबाबत भुजबळ आणि गिरीश महाजन मध्ये होणार चर्चा.

शरद पवारांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड

राजगड या ठिकाणी शरद पवारांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड

शरद पवार सुप्रिया सुळे साठी घेणार होते वेल्ह्यामध्ये सभा

तांत्रिक बिघाड झाल्याने पवार सुप्रिया सुळे यांच्या गाडीतून सभेच्या ठिकाणी रवाना

अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवरील सुनावणी पुन्हा पुढे ढकलली

ED च्या अटकेविरोधात अरविंद केजरीवाल यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी अपूर्ण राहिली

शुक्रवारी पुन्हा या प्रकरणी सुनावणी सुरू राहणार

आज केजरीवाल यांचे वकील सिंघवी यांनी त्यांच्या केसचे वर्णन संजय सिंग यांच्या केस सारखे केल

दोघांचे (संजय सिंह आणि केजरीवाल) जबाब न घेता त्यांना अटक करण्यात आली - सिंघवी

या प्रकरणात इतक्या दिवसानंतर केजरीवाल यांची अटक आवश्यक का वाटली ?

कोर्टाचा ED ला सवाल

निवडणुकीपूर्वी झालेली अटक चुकीची होती या युक्तिवादाला त्यांचे काय उत्तर ?

आनंदाची बातमी! यंदा मान्सून लवकर धडकणार, परिस्थिती अनुकूल

देशात उषणतेची लाट आली आहे. वाढत्या गर्मीमुळे अंगाची लाहीलाही होत असताना एक आनंदाची बातमी आहे. मान्सनसाठी यंदा अनुकूल परिस्थिती आहे. येत्या २१ दिवसात मान्सून केरळमध्ये धडकणार आहे.

आनंदाची बातमी! यंदा मान्सून लवकर धडकणार, परिस्थिती अनुकूल

मुंबईत आजही उष्णतेची लाट, नवी मुंबईचा पारा ४२ अंशांवर

मुंबई आणि mmrd विभागात आज पण उष्णतेची लाट

मुंबई कालच्या पेक्षा आज जास्त तापमान

मुंबई 39.7, विरार 40.5, मीरा रोड 41, नवी मुंबई 42, मुलुंड आणि पनवेल 42.4, ठाणे 42

डोबिंवली आणि बदलापूर 4३, कल्याण 43, मुंबरा आणि भिवंडी 43.२, मुरबाड 43.7, कर्जत 44.2

मुंबईत धडाडणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तोफ

महाराष्ट्र दिनाच्या औचित्यावर उद्या भाजपचा मुंबईत कार्यकर्ता मेळावा

दादरच्या कामगार मैदानावर संध्याकाळी 5 वाजता मेळाव्याचे आयोजन

मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलारांसह भाजपचे महत्त्वाचे नेते राहणार मेळाव्याला हजर

मुंबईतील राजकीय प्रचारात रंगत येणार

उद्याच्या मेळाव्यापुर्वी महायुती दक्षिण मुंबईचा उमेदवार जाहीर करणार का याकडे सर्वांचे लक्ष

कल्याणमधून श्रीकांत शिंदे २ मे रोजी उमेदवारी अर्ज भरणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह दिग्गज नेते उपस्थित राहणार अर्ज भरण्यापूर्वी डोंबिवलीतून निघणार भव्य मिरवणूक

शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी कॉंग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, रासप, पिपल्स रिपब्लिकन पार्टी या महायुतीच्या घटकपक्षांचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. डोंबिवलीचे ग्रामदैवत श्री गणेश मंदिरात दर्शन घेऊन डॉ. श्रीकांत शिंदे अर्ज भरण्यासाठी जाणार श्री गणेश मंदिरापासून संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलापर्यंत भव्य मिरवणूक काढली जाणार असून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे.

निवडणूक लढवण्यावर शांतीगिरी महाराज ठाम, गिरीश महाजनांसोबतची चर्चा निष्फळ

- गिरीश महाजन आणि शांतीगिरी महाराजांची चर्चा निष्फळ

- निवडणूक लढवण्यावर शांतीगिरी महाराज ठाम

- महायुतीकडून तिकीट न मिळाल्यास अपक्ष निवडणूक लढवणार

- भाजपकडून उमेदवारी देणं सध्या शक्य नसल्याचं गिरीश महाजन यांचे मत

- मात्र महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी आपण उभे राहावं अशी महाराजांना विनंती

- येत्या दोन दिवसांत महायुतीच्या उमेदवाराचा तिढा सुटेल असा महाजनांचा दावा

Narendra Modi : PM मोदी यांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र

गांधीनगर लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी शाह यांना दिल्या शुभेच्छा

केंद्रीय गृहमंत्री म्हणून अनेक महत्त्वाच्या निर्णयात आपली भूमिका महत्त्वाची

कलम 370 रद्द, CAA या महत्त्वाच्या गोष्टींचा पत्रात उल्लेख

Baba Ramdev : न्यायालय अवमान प्रकरण : सुप्रीम कोर्टाकडून बाबा रामदेव यांना मोठा दिलासा

सुप्रीम कोर्टाचा बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्णन यांना मोठा दिलासा

न्यायालयाचा अवमान केल्या प्रकरणी प्रसिद्ध केलेल्या माफी नाम्याच्या भाषेवर कोर्टाने समाधान केलं व्यक्त

दोघांनाही पुढील सुनावणीला कोर्टात वैयक्तिक हजर राहण्यापासून सूट

Lok Sabha Election : नगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या तयारी सुरू

अहमदनगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या तयारी सुरू

अहमदनगर शहरातील सावेडी भागात होणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा..

अहमदनगर दक्षिण मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी सहा मे रोजी येणार असल्याची माहिती.

सावेडी परिसरातील बारा एकर मैदानाची निवड सभेसाठी करण्यात आली आहे.

Mallikarjun Kharge : नसीम खान यांचं राज्यसभा किंवा विधानसभेत पुनर्वसन करु - मल्लिकार्जुन खरगे

"नसीम खान यांचं राज्यसभा किंवा विधानसभेत पुनर्वसन करु, असे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचं सूचक वक्तव्य

तिकीट न मिळाल्यानं नसीम खान नाराज

नाराज नसीम खान यांचा मनधरणीचा प्रयत्न

Dadar News : दादर पूर्वमधून १.१४ कोटींची रोकड जप्त

दादर पूर्वच्या शिंदे वाडी येथून १.१४ कोटींची रोकड जप्त

कारमधून जप्त करण्यात आली रोकड

निवडणूक आयोगाच्या static surveillance टीमची कारवाई

कार चालक रोकड संदर्भात समाधानकारक उत्तरे देऊ न शकल्याने कारवाई , १.१४ कोटी रुपये करण्यात आले जप्त

रोकड लालबागच्या बांधकाम आणि हॉटेल व्यावसायिकाची असल्याची माहिती

रक्कम मोठी असल्याने निवडणूक आयोगाने आयकर विभागाला दिली माहिती

Lok Sabha Election : उत्तर मुंबईतून काँग्रेसकडून २ उमेदवारांची चर्चा

उत्तर मुंबईतून काँग्रेसकडून दोन उमेदवारांची चर्चा

भूषण पाटील यांना उमेदवारी देण्याची अधिक शक्यता

भूषण पाटील यांच्यासह काळू बुधालिया यांच्या नावाची चर्चा

आजच होणार काँग्रेचा मुंबई उत्तरवरून उमेदवाराची घोषणा

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांची उद्या हातकणंगले आणि कोल्हापुरात जाहीर सभा

उद्धव ठाकरे यांची उद्या हातकणंगले आणि कोल्हापुरात जाहीर सभा होणार आहे.

शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारार्थ कोल्हापुरात जाहीर सभा

तर हातकणंगलेचे ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित पाटील यांच्या प्रचारार्थ इचलकरंजी येथे जाहीर सभा

उद्या संध्याकाळी 6.30 वाजता इचलकरंजी येथे जाहीर सभा

यानंतर कोल्हापूरमध्ये शाहू महाराज छत्रपती यांच्यासाठी रात्री 9 वाजता गांधी मैदानात जाहीर सभा

lok sabha Election : महायुतीकडून मुंबई उत्तर पश्चिममधून रवींद्र वायकर यांना उमेदवारी

लोकसभा निवडणूक - २०२४ साठी मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Shirur Lok Sabha : शिरुर लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवाराला तुतारी चिन्ह

शिरूर लोकसभा मतदार संघात देखील अपक्ष उमेदवाराला तुतारी चिन्ह मिळालं आहे. मनोहर वाडेकर या अपक्ष उमेदवाराला हे चिन्ह देण्यात आलं आहे. तुतारी चिन्ह याआधी बारामती लोकसभा मतदारसंघात देखील एका अपक्ष उमेदवारला देण्यात आलं होतं.

Nashik Accident : नाशिकमध्ये बसचा टायर फुटून भीषण अपघात; 5 ते ६ जण दगावल्याची भीती 

चांदवडच्या राहुड घाटात बस-ट्रकचा अपघात

मुंबई-आग्रा महामार्गावरील राहुड घाटात झाला अपघात

अपघातात 5 ते 6 प्रवाशी दगावल्याची भीती

अपघातात काही प्रवासी जखमी

बसचा टायर फुटून अपघात झाल्याची माहिती

lok Sabha Election : पियुष गोयल आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार पियुष गोयल हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी ते बोरिवली पूर्वेकडील शांतीवन येथील गणपती मंदिरात दर्शन घेतलं. बोरवली येथील गणपती मंदिरात उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक आमदार योगेश सागर आमदार प्रकाश सुर्वे आमदार अतुल भास्कर कर आमदार प्रवीण दरेकर आमदार सुनील ठाणे देखील उपस्थित झाले आहेत.

Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई; जलाशयात फक्त 11. 62 टक्के पाणीसाठा.

बुलढाण्यात तापमान वाढीमुळे जिल्ह्यातील जलाशयात पाण्याचा बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जलाशयात फक्त 11. 62% जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक तालुक्यात भीषण पाणी टंचाई उद्भवलेली आहे. अजूनही पावसाळ्याला दीड महिना बाकी असल्याने आगामी काळात जिल्ह्यातील अनेक गावात पिण्याचे पाण्याची टंचाई निर्माण होणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 169 गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे.

Vijay Shivtare : विजय शिवतारे अजित पवार यांच्या भेटीला

विजय शिवतारे अजित पवार यांच्या भेटीला पोहोचले आहेत.

जिजाई बंगल्यावर विजय शिवतारे दाखल

दोन दिवसांपूर्वी पुरंदरमध्ये शरद पवारांची झाली होती सभा

याबद्दल आणि इतर विषयांवर चर्चा करण्याकरता अजित पवारांची भेट घेण्यासाठी विजय शिवतारे आले आहेत.

Nashik News : नाशिककरांसाठी आनंदाची बातमी; गंगापूर धरणाची पाणी क्षमता वाढली

- नाशिककरांसाठी आनंदाची बातमी

- नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाची क्षमता २ कोटी १५ लाख ८८ हजार लिटरनं वाढली

- मागील १४ दिवसांत गंगापूर धरणातून काढला २१ हजार ६२३ क्युबिक मीटर गाळ

- ७ टीएमसी क्षमता असणाऱ्या गंगापूर धरणाची क्षमता गाळामुळे ५.५ टीएमसी पर्यंत कमी झाल्यानं काढला जातोय गाळ

- मागील १४ दिवसांपासून धरणातून गाळ काढण्याच्या कामाला करण्यात आलीय सुरुवात

- दररोज १० तास जेसीबीच्या सहाय्याने काढला जातोय गाळ

- धरणातून काढलेला गाळ परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात पोहचवला जातोय

- येत्या १५ जूनपर्यंत गाळ काढण्याचं काम सुरू राहणार असल्यानं धरणाच्या क्षमतेत मोठी वाढ होण्याची शक्यता

Wardha News : वणा नदीपात्रातून मशीनच्या सहाय्याने अवैध वाळू उपसा; पाच आरोपीना अटक

वर्धा : समुद्रपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वाकसूर शिवारातील वणा नदी पात्रातून जेसीबी मशीनच्या सहाय्याने अवैध वाळू उपसा सुरु होता. मशीनच्या सहाय्याने उपसा करत ट्रॅक्टरने विनापरवाना रेती वाहतूक करणाऱ्या पाच जणांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत 41 लाख दहा हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com