Beed Lok Sabha: बीडमध्ये पंकजा मुंडेंना मोठा धक्का; महाविकास आघाडीची ताकद वाढली!

Beed Politics News: बीड लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे.
Beed Lok Sabha
Beed Lok SabhaSaam TV

Beed Latest Marathi News

बीड लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे. माजी मंत्री सुरेश नवले यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. अगदी काहीच दिवसांपूर्वी नवले यांनी शिवसेना शिंदे गटाला जय महाराष्ट्र केला होता.

Beed Lok Sabha
Maharashtra Lok Sabha 2024: सभेला उत्तर सभेने! महाविकास आघाडी एकजुटीने मैदानात; आज पुण्यात जाहीर सभा

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे लाभार्थ्यांची गर्दी होत असल्याने निष्ठावंत शिवसैनिकांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत सुरेश नवले यांनी शिंदेंच्या शिवसेनेला रामराम केला होता.आता त्यांनी बजरंग सोनवणे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

नवले यांची बीडमध्ये मोठी ताकद आहे. त्यांच्या पाठिंब्याने महाविकास आघाडीची ताकद वाढली असून महायुतीला मोठा झटका बसला आहे. बीड लोकसभा मतदारसंघातून यंदा भाजपने पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीने बजरंग सोनवणे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे.

बजरंग सोनावणे हे मराठा उमेदवार असल्याने बीडमध्ये ओबीसी विरुद्ध मराठा असा थेट सामना रंगण्याची शक्यता आहे. अशातच सुरेश नवले यांनी सोनवणे यांना पाठिंबा जाहीर केल्याने पंकजा मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, आगामी काळात बीडमधून विधानसभेची निवडणूक देखील लढवणार असल्याचं सुरेश नवले यांनी जाहीर केलं आहे.

एक कार्यकर्ता मेळावा घेत नवले यांनी ही घोषणा केली आहे. मात्र, कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार हे त्यांनी स्पष्ट केलेलं नाही. "सध्या सत्ता मिळाल्याने मुख्यमंत्र्यांकडे अनेक लाभार्थ्यांची गर्दी होत आहे, मात्र पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी काहीच काम होताना दिसत नाही. त्यामुळे अनेकजण नाराज असून शिवसेनेतून बाहेर पडत आहेत", असं नवले यांनी म्हटलंय.

Beed Lok Sabha
Shirur Loksabha: बारामतीनंतर शिरुरमध्येही अपक्षाच्या हाती 'तुतारी'; अमोल कोल्हेंची वाढणार चिंता?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com