Shirur Loksabha: बारामतीनंतर शिरुरमध्येही अपक्षाच्या हाती 'तुतारी'; अमोल कोल्हेंची वाढणार चिंता?

Loksabha Election: महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांचे तुतारी वाजवणारा माणूस चिन्ह असतानाच तशाच पद्धतीचे दुसरे चिन्ह दिल्याने आक्षेप घेण्यात आला होता. आता बारामतीनंतर शिरुरमध्येही तुतारीवरुन मतदारांमध्ये संभ्रम होण्याची शक्यता आहे.
Shirur Loksabha:
Shirur Loksabha:Saamtv

पुणे|ता. ३० एप्रिल २०२४

बारामती लोकसभा मतदार संघात अपक्ष उमेदवाराला तुतारी चिन्ह दिल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांचे तुतारी वाजवणारा माणूस चिन्ह असतानाच तशाच पद्धतीचे दुसरे चिन्ह दिल्याने आक्षेप घेण्यात आला होता. आता बारामतीनंतर शिरुरमध्येही तुतारीवरुन मतदारांमध्ये संभ्रम होण्याची शक्यता आहे.

बारामती लोकसभेप्रमाणेच आता शिरूर लोकसभेत ही अपक्ष उमेदवारास तुतारी चिन्ह मिळालं आहे. त्यामुळं तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह असणारे महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार अमोल कोल्हेची चिंता वाढण्याची शक्यता आहे. शिरुर लोकसभेचे अपक्ष उमेदवार मनोहर वाडेकर यांना ट्रंपेट हे वाद्य चिन्ह म्हणून दिले आहे.

परंतु निवडणूक आयोगाने ट्रंपेट या वाद्याचा उल्लेखही तुतारी असाच केला आहे. त्यामुळे वाद्य वेगवेगळी असली तरी चिन्हाचे नाव मात्र एकच आहे. त्यामुळे चिन्ह पाहून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. याचा फटका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अमोल कोल्हेंना बसणार का? हे पाहणं आता महत्वाचे ठरणार आहे.

Shirur Loksabha:
Mother And Son Killed In Amravati: दुहेरी हत्याकांडाने अमरावती हादरलं; ३०० फुट जागेसाठी मायलेकाला संपवलं

आज शरद पवारांची सभा..

दरम्यान, शिरुरमध्ये अमोल कोल्हेंविरोधात शिवाजीराव आढळराव पाटील यांचे आव्हान आहे. अमोल कोल्हे यांच्या प्रचाराठी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार मैदानात उतरले आहेत. आज शरद पवार यांची ओतूर येथे जाहीर सभा पार पडणार आहे. आजच्या सभेतुन शरद पवार काय भूमिका मांडणार? पवारांच्या निशाण्यावर कोन असणार हे पहावे लागणार आहे.

Shirur Loksabha:
Buldhana News: डीजेच्या दणदणाटामुळे मधमाशा चवताळल्या; वऱ्हाडी मंडळींवर चढवला हल्ला, लोक पळतच सुटले

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com