Mother And Son Killed In Amravati: दुहेरी हत्याकांडाने अमरावती हादरलं; ३०० फुट जागेसाठी मायलेकाला संपवलं

Amravati Crime News: अमरावतीमध्ये जागेच्या वादातून दुहेरी हत्याकांड झाल्याचं समोर आलं आहे. ३०० फुट जागेसाठी आई आणि मुलाची हत्या केल्याची घटना घडली आहे.
Mother And Son Killed In Amravati
Mother And Son Killed In AmravatiYandex

अमर घटारे, साम टिव्ही प्रतिनिधी अमरावती

अमरावतीमध्ये (Amravati) जागेच्या वादातून दुहेरी हत्याकांड ( Mother And Son Killed In Amravati) झाल्याचं समोर आलं आहे. ३०० फुट जागेसाठी आई आणि मुलाची हत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना २९ एप्रिल रोजी दुपारी घडली आहे. मंगलधाम परिसरातील बालाजी नगरमध्ये हे हत्यांकांड घडलं आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली होती.

आई कुंदा देशमुख आणि मुलगा सूरज देशमुख अशी मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. या घटनेत त्यांचे वडिल थोडक्यात बचावले आहेत. तर घटनेनंतर आरोपी पसार झाले आहेत. वडील थोडक्यात बचावले आहेत. घटनास्थळी आरोपींची मोठी गर्दी झाली होती. क्षुल्लक कारणावरून ही घटना ( Mother And Son Killed) घडल्याचं समोर आलं आहे.

मारेकरी घटनास्थळावरून पसार झाला होता. त्याचा पोलीस शोध घेत होते. यावेळी पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली आहे. यावेळी परिसरात शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती. देवानंद लोणारे (Amravati Crime) असं आरोपीचं नाव असून सध्या तो फरार झाला होता. आजकाल मालमत्तेच्या वादातून अशा घटनांचं प्रमाण वाढलं आहे.

३०० फूट खुल्या जागेच्या वादातून एका शेजाऱ्याने चक्क आपल्या शेजारील मायलेकावर घरात घुसून धारदार शस्त्राने हल्ला केल्याची खळबळजनक घटना अमरावती शहरातील बालाजीनगर येथे (Amravati Crime News) घडली. हत्येनंतर चार तासात देवानंद लोणारे नामक आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी आणि मृतक यांच्या शेजारी तिनशे फूट खुली जागा आहे. मात्र , दोघांमध्ये या जागेच्या कब्जावरून वाद झाला (Amravati News) होता. या वादातून ही हत्या करण्यात आलीय.

Mother And Son Killed In Amravati
Crime News: प्रेमाचा भयानक शेवट! लग्नासाठी प्रेयसीचा दबाव, संतापलेल्या टॅक्सी ड्रायव्हरकडून भयानक कृत्य

यावेळी घटनास्थळी पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी भेट दिली (Crime News) होती. तेव्हा पोलिसांनी हत्येसाठी वापरलेले शस्त्र जप्त केले होते. आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सुरू केला आहे. मात्र, टिच भर जागेसाठी (Land Dispute) शेजाऱ्याला संपवल्याने अमरावतीत खळबळ उडाली आहे.

Mother And Son Killed In Amravati
Nagpur Crime: तिकीटावरुन वाद.. धावत्या बसमध्ये प्रवाशाचा कंडक्टरवर चाकू हल्ला; नागपुरमधील घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com