१ मे हा दिन जगभरात 'कामगार दिन' म्हणून साजरा केला जातो. जगभरातील कामगारांना, मजूरांना हा दिवस समर्पित केला जातो. या दिनाला 'आंतरराष्ट्रीय श्रमिक दिवस' असेही म्हणतात. कामगारांना सन्मान मिळण्यासोबतच त्यांना त्यांच्या हक्कासाठी आवाज उठवता यावा. कामगारांना समजात अधिक चांगले स्थान मिळावे, यासाठी 'कामगार दिन' साजरा केला जातो. कोणत्याही देशाचा विकास होताना कामगारांची महत्त्वाची भूमिका असते. प्रत्येक काम हे कामगारांमुळेच पूर्ण होते. त्यामुळेच हा दिन साजरा केला जातो.
१८८९ मध्ये 'कामगार दिन' साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आहे. ज्यावेळी कामगार आपल्या हक्कासाठी एकत्रितपणे रस्त्यावर आला होता तेव्हा कामगार दिन साजरा करण्याची सुरुवात शिकागो आणि अमेरिकेत सुरु झाली.
१८८६ पूर्वी अमेरिकेत कामगार चळवळ सुरु झाली. अमेरिकन कामगार आपल्या हक्कासाठी संपावर गेले, रस्त्यावर आले. कामाचे तास जास्त असल्याने त्यांनी ही चळवळ सुरु केली होती. त्या काळात कामगार १५ तास काम करायचे. आंदोलनादरम्यान पोलिसांनी कामगारांवर गोळीबार केला. यामुळे काही कामगारांनी जीव गमावा लागला. अनेक कामगार जखमी झाले.
या घटनेनंतर १८८९ मध्ये आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत कामगारांना दिवसाला ८ तास काम करावे लागेल, असा निर्णय घेण्यात आला. परिषदेनंतर १ मे रोजी कामगार दिन साजरा करण्याचे ठरवले. दरवर्षी १ मे रोजी कामगारांना सुट्टी देण्याचाही निर्णय घेण्यात आला. नंतर अनेक देशात कामगारांना ८ तास काम करण्याचा निर्णय लागू केला.
अमेरिकेसह इतर अनेक देशात १ मे १८८९ पासून कामगार दिन साजरा करण्यात आला. परंतु भारतात जवळपास ३४ वर्ष म्हणजे १ मे १९२३ पासून कामगार दिन साजरा करण्यात आला. बारतीय कामगार त्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवत होते. तयाच चळवळीदरम्यान हा निर्णय घेण्यात आला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.