Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Shocking News : मुंबई हादरली! तरुणावर अनैसर्गिक अत्याचार, जबरदस्ती लिंग परिवर्तन, तृतीयपंथींच्या टोळीचं भयंकर कृत्य

Mumbai Transgender Crime News : मुंबईत ट्रान्सजेंडर टोळीने १९ वर्षीय विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण केले. त्याचा छळ केला, लिंग परिवर्तन करण्यास भाग पाडलं, शिवाय त्याला साडी नेसून भीक मागायला लावली. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली असून पोलीस तपास सुरु आहे.

Alisha Khedekar

मुंबईत ट्रान्सजेंडर टोळीने १९ वर्षीय विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण केले

मुलाच्या आईकडून खंडणी मागण्यात आली

त्याचा छळ केला, लिंग परिवर्तन करण्यास भाग पाडलं, शिवाय त्याला साडी नेसून भीक मागायला लावली

या प्रकरणी चौघांना अटक

मुंबईतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका ट्रान्सजेंडर टोळीने १९ वर्षीय विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण केले आहे. धक्कदायक म्हणजे तरुणाला जबरदस्तीने लिंग बदल शस्त्रक्रिया करायला लावली. शिवाय त्याच्याकडून पैसे उकळले आणि धमक्या देखील दिल्या. यादरम्यान या मुलावर जबरदस्ती करून अश्लील कृत्यांचे चित्रीकरण करण्यात आले. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मालाड मधील कुरार गावातील अप्पापाडा येथील रहिवासी असलेल्या १९ वर्षीय किशोरने पोलिसांना सांगितले की, त्याची सुमारे दीड वर्षांपूर्वी कावेरी (कार्तिक वेदमणी निकम) तिच्याशी मैत्री झाली. या ओळखीतून त्याची भेट नेहा खान ( नेहा इप्टे ) तिच्याशी झाली. नेहा ही मालवणीतील एका ट्रान्सजेंडर गटाची प्रमुख होती.

५ ऑगस्ट रोजी किशोरला नेहाच्या घरी बोलावण्यात आले होते. जिथे नेहा, कावेरी, भास्कर शेट्टी आणि माही यांनी त्याला लिंग परिवर्तनासाठी जबरदस्ती केली. जेव्हा पीडित तरुणाने लिंग परिवर्तनासाठी नकार दिला तेव्हा त्यांनी त्याला एका खोलीत बंद केले, त्याला मारहाण केली आणि अश्लील कृत्ये करण्यास भाग पाडले. या घटनेचा व्हिडिओ देखील काढण्यात आला. त्यानंतर व्हिडिओचा वापर पैशाची मागणी करण्यासाठी करण्यात आला. व्हिडिओ व्हायरल होईल या भीतीपोटी पीडित मुलीच्या आईने दहा हजार रुपये ट्रान्सफर केले.

त्यानंतर पुढील काही दिवसात या टोळीने अधिक पैशांची मागणी केली आणि सार्वजनिकरित्या त्याचा अपमान केला. शिवाय त्याला साडी नेसवून भीक मागायला देखील लावली. यानंतर २८ ऑक्टोबर रोजी नेहा, तिचा पती सोहेल खान, त्यांचा दत्तक मुलगा भास्कर आणि इतरांनी त्याला सुरतमधील रिपल मॉलजवळील रुग्णालयात नेले. तिथे त्याला कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यास भाग पाडण्यात आले आणि लिंग बदलाची शस्त्रक्रिया करण्यात आली. मुंबईत परतल्यानंतर, नेहाने त्याच्या शस्त्रक्रियेच्या ठिकाणी गरम पाणी ओतले आणि त्याला घरकाम करायला भाग पाडले असा दावा त्याने केला आहे. त्याला सोडण्यासाठी तिने साडेचार लाख रुपयांची मागणी केली.

४ नोव्हेंबर रोजी किशोरने त्यांच्या तावडीतून पळ काढला. मात्र तो पुन्हा पकडला गेला. सुदैवाने आजूबाजूला असलेल्या स्थानिक रहिवाशांच्या हस्तक्षेपामुळे त्याची टोळीच्या तावडीतून सोडण्यात आले. त्यांनतर या पीडित मुलाने पोलीस ठाणे गाठत संबंधित टोळीबद्दल तक्रार दाखल केली. या विद्यार्थ्याने तक्रारीत त्याच्यावर झालेल्या लैंगिक शोषण या ट्रान्स जेंडर टोळीने केल्याचा आरोप केला.

पीडित तरुणाच्या तक्रारीच्या आधारे, आरोपींवर कट रचणे, अपहरण, लैंगिक अत्याचार, खंडणी आणि जबरदस्तीने लिंग परिवर्तन करणे या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. पोलिसांनी या प्रकरणात चार जणांना अटक केली असून या चौघांची चौकशी सुरू आहे. या घटनेने मुलांच्या सुरक्षेवरील प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

252 कोटींचं ड्रग्ज कनेक्शन उघड; दाऊदचा भाचा, श्रद्धा कपूरच्या नावाचा समावेश, मनोरंजन विश्वात खळबळ|VIDEO

Maharashtra Live News Update: नाशिकच्या वनविहार कॉलनी परिसरात आणखी एक बिबट्या

Chanakya Niti: तुमच्या चांगुलपणाचा फायदा तर घेत नाहीत ना? चाणक्यांनी सांगितली माणसं ओळखण्याची ट्रिक

Maharashtra Politics: पुन्हा काका-पुतण्यात दुरावा! बिहार निवडणुकीच्या धामधुमीत भाजपनं खेळला डाव, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का

Bihar Election Result Live Updates : बिहारमधील विजयाचा अकोला भाजपकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT