Bhide Bridge Closed for Pedestrian Skywalk Work Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी, भिडे पूल वाहतुकीसाठी बंद

Bhide Bridge Closed for Pedestrian Skywalk Work: पुण्यातील बाबा भिडे पूल वाहतुकीसाठी अचानक बंद करण्यात आला आहे. मेट्रोच्या कामासाठी पालिका प्रशासनाकडून पूल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Priya More

अक्षय बडवे, पुणे

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. भिडे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पुणे मेट्रोच्या पादचारी पुलाचे काम सुरू असल्यामुळे भिडे पूल वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. तब्बल १.५ महिना पुण्यातील भिडे पूल वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. पुणेकरांची गैरसोय न व्हावी यासाठी वाहतूक विभाग पर्यायी मार्ग खुले करणार आहे.

पुणे शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या भिडे पुलावर दररोज हजारो गाड्यांची ये-जा होत असते. भिडे पूल वाहतुकीसाठी बंद राहणार असल्यामुळे पुणेकरांची चांगलीच गैरसोय होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील बाबा भिडे पूल वाहतुकीसाठी पुढील दीड महिने बंद राहणार आहे. पुणे मेट्रोच्या डेक्कन जिमखाना या मेट्रो स्टेशनच्या बाजूला असलेला पादचारी पुलाचे काम सुरू असल्यामुळे या ठिकाणी वाहतूक पुढील दीड महिने पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मात्र कुठलीही पूर्वसूचना न देता अचानकपणे भिडे पूल बंद झाल्यामुळे या ठिकाणी नागरिकांची मात्र मोठी गैरसोय होताना दिसते आहे.

पुण्यातील नारायण पेठ, सदाशिव पेठ या भागातून तसेच उपनगरातून हजारोंच्या संख्येने वाहनं याच भिडे पुलावरून दररोज ये-जा करतात. त्यामुळे वाहतूक शाखेला हा पूल बंद केल्यानंतर पर्यायी मार्ग देण्याचं मोठं आवाहन उभे ठाकले आहे. कोणतिही पूर्वसूचना न देता पुण्यातील भिडे पूल अचानक बंद केल्यामुळे पुणेकरांमध्ये नाराजी आहे. भिडे पूल बंद केल्यामुळे आता पुण्यात मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.

भिडे पूल हा पुण्यातील मध्यवर्ती भागात मुठा नदीवर वसलेला आहे. या पुलावरून दररोज हजारो वाहनांची ये-जा होते. नारायण पेठ, सदाशिव पेठ असे शहरातील प्रमुख भाग तसेच जे एम आणि एफसी रोड या ठिकाणी जाण्यासाठी याच मार्गाचा वापर केला जातो. दुसऱ्या बाजूला उपनगरात राहणाऱ्या नागरिकांसाठी नदीपात्रातील रस्ता अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. परंतु आता हा भिडे पूल बंद केल्यामुळे त्याचा परिणाम नदीपात्रातील वाहतुकीवर सुद्धा होणार आहे.

मेट्रोच्या कामामुळे आपण दीड महिना बंद राहत असल्यामुळे मेट्रो प्रशासनाकडून क्षमस्व अशी पाटी या ठिकाणी लावण्यात आली आहे. पण रहदारीचा हा संपूर्ण भाग असल्यामुळे पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेवर इथे होणारी वाहतूक कोंडी सोडवण्याचे मोठा आव्हान असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात गणपती विसर्जनाला रेकॉर्ड, ३१ तासांपासून मिरवणूक सुरूच

Online Food Delivery : ऐन सणासुदीच्या हंगामात महागाईची फोडणी; ऑनलाइन जेवण ऑर्डर करणे महागणार?

Lalbaugcha Raja Visarjan 2025 : भरतीच्या अडथळ्यामुळे लालबागच्या राजाच्या विसर्जनाला विलंब|VIDEO

Weekly Horoscope: 'या' राशींच्या व्यक्तींनी आर्थिक व्यवहार जपून करावे; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

KDMC च्या प्रसुतीगृहात १ दिवसाच्या बाळाचा मृत्यू; डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी हलगर्जी केल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT