Shreya Maskar
क्रिकेटच्या मैदानावर आपल्या खेळाने संपूर्ण जगाचे मन जिंकणाऱ्या विराट कोहलीचा आज (5 नोव्हेंबर ) वाढदिवस आहे. आज विराट 37 वर्षांचा झाला आहे.
जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये विराट कोहलीचे नाव येते. विराट कोहली स्टार्टअप, व्यवसाय, जाहिराती, फूड, ब्रँडस यात मोठी गुंतवणूक करतो.
विराट कोहलीचे मुंबईत जुहू येथे 'वन८ कम्यून' नावाचे रेस्टॉरंट आहे. विराट कोहली क्रिकेट मॅचमधून कोट्यावधींची कमाई करतो. (IPL, Test, ODI,)
विराट कोहलीचे वरळी येथे आलिशान अपार्टमेंट आहे. ज्याची किंमत अंदाजे 34 कोटी रुपये आहे. गुरुग्राममध्ये एक बंगला देखील आहे. तसेच अलिबागमध्ये देखील एक आलिशान प्रोपर्टी आहे.
विराट कोहलीकडे बेंटले, ऑडी, रेंज रोव्हर आणि लॅम्बोर्गिनी सारख्या ब्रँडच्या लक्झरी कार आहेत. एका प्रमोशनल इंस्टाग्राम पोस्टसाठी विराट कोहली 9 ते 12 कोटी फी घेतो.
विराट अनेक मोठ्या ब्रँडच्या जाहिराती करतो. यात प्यूमा, एमआरएफ, टिसॉट, मान्यवर यांसारख्या मोठ्या ब्रँडचा समावेश आहे. यातून विराट 7 ते 10 कोटी रुपये मानधन घेतो.
2017 ला विराट कोहलीने बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत लग्नगाठ बांधली. त्यांना दोन मुलं देखील आहेत. त्यांच्या मुलांची नावे वामिका (मुलगी) आणि अकाय (मुलगा) आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, विराट कोहलीची एकूण संपत्ती 1050 कोटी रुपये आहे. क्रिकेटमधील आपल्या यशानंतर विराट कोहलीच्या नेटवर्थमध्ये वाढ झाली आहे.